निवडणुकीपुरते राजकारण आणि त्यानंतर समाजकारण या संस्कारात आम्ही वाढलो
लातूरच्या संस्कृतीला कुठेही धक्का न लागू देता येथील विकास प्रक्रीयेला गती देणार
शहरातील विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगीआमदार अमित विलासराव देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर (प्रतिनधी) : –
निवडणुकीपुरते राजकारण आणि त्यानंतर समाजकारण या संस्कारात आम्ही वाढलो
आहोत त्यामुळे लातूरच्या संस्कृतीला कुठेही धक्का न लागू देता येथील विकास प्रक्रीयेला गती
देण्याचे काम आम्ही निरंतरपणे चालू ठेवणार असल्याचे प्रतीपादन माजी मंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी केले आहे.
रवीवार दि. १३ जुलै २५ रोजी सांयकाळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांच्या हस्ते शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील जुना मळवटी रस्त्यांचे मजबुतीकरण, प्रभाग
१८ मधील डॉ. भाताब्रे हॉस्पिटल ते महात्मा बसवेश्वर चौक आणि डॉ. भाताब्रे हॉस्पिटल ते
स्क्रॅप मार्केट या रस्त्यांचे नुतणीकरण, प्रभाग क्रमांक १७ मधील सहयाद्री हॉस्पिटल जवळ
राजीव गांधी चौक ते जुना औसा रोड रस्त्याचे नुतणीकरण तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील
रुद्राणी बुक ते खुने यांच्या घरापर्यंतचा रस्ता आणि मारुती गायकवाड ते दिपक काळे यांच्या
घरापर्यंतच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण आदी विकासकामांचा शुभारंभ माजी मंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
भाताब्रे हॉस्पिटल जवळ भुमिपुजनाचा कार्यक्रम सुरू असतांना भाजपच्या काही मंडळींनी
घोषणाबाजी केली तो धागा पकडून आपल्या भाषणात बोलतांना आमदार अमित विलासराव
देशमुख म्हणाले की, निवडणुकीपुरते राजकारण आणि त्यानंतर समाजकारण करण्याची
शिकवण लातूरमध्ये यापुर्वीच्या नेते मंडळीकडून मिळाली त्या संस्कारात आम्ही वाढलो आहोत.
त्यामुळे निवडणुकीतले राजकारण विसरुन आम्ही समाजकारण सुरू केले आहे. सत्तेत
नसल्यामुळे संघर्ष करुन लातूरसाठी अनेक विकासकामे मंजूर करुन घेतली आहेत. कुठे विरोध
झाला कुठे पाठींबा मिळाला याचा विचार न करता आम्ही शहरातील गरज ओळखून
विकासकामांना चालना देण्यास सुरूवात केली आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाची मंडळी मात्र निवडणुकीप्रमाणे
विकासकामानाही विरोध करतांना दिसत आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोक विकासकामांच्या
विरोधात घोषणा देत असल्याचे चित्र आज लातूरकर पहील्यादाच पाहत असल्याचे आमदार
अमित देशमुख यांनी म्हटले आहे. कोणी विरोध करो कोणी घोषणा देवोत आम्ही त्याकडे लक्ष
देणार नाहीत आम्ही आमचे सकारात्मकदृष्टीतून काम चालू ठेवणार आहोत, याकामाला विरोध
करणाऱ्यांचे काय करायचे हे वेळ आल्या नंतर जनता ठरवत असते असेही त्यांनी यावेळी
म्हटले आहे.
या कार्यक्रमाचे प्रस्तावीक करतांना प्रभाग १८ चे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुंदर पाटील
कव्हेकर म्हणाले की, महाराष्ट्राचे शांत, संयमी नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचे
लातूरमध्ये सुसंस्कृत राजकारणाचे संस्कार आहेत त्या संस्काराला अनुसरुन माजी मंत्री
आमदार अमित विलासराव देशमुख राजकारण करीत आहेत. त्याचा प्रत्येक कार्यकर्ता त्याच
संस्कारात वाढलेला आहे, त्यामुळे आम्ही अडवणुकीचे नव्हे तर विकासाचे राजकारण करणार
आहोत. विरोध करणाऱ्यांच्या घोषणाबाजीला आम्ही विकास योजना राबवून उत्तर देणार आहोत.
या प्रसंगी लातूर जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर ॲड.
दिपक सुळ, महीला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विदया पाटील, अभय सांळुके, लक्ष्मीकांत
मंठाळे, सिंकदर पटेल, व्यकंटेश पुरी, सचिन बडडापल्ले, डॉ. भाताब्रे, डॉ. हनुमंत किणीकर,
ॲड. फारुक शेख, कैलास कांबळे, प्रविण कांबळे, अहमदखा पठाण, इरफान शेख, लायक पटेल,
प्रविण सुर्यवंशी, सुलेखा कारेपूरकर, पवनकुमार गायकवाड, अभिजीत इगे, अतिश चिकटे,
विजय देशमुख, इम्रान सय्यद, लायक पटेल, सुभाष जाधव, हभप चाटे महाराज, शशिकांत
मजगे, उध्दव पिनाटे, डॉ. व्यकंटराव जाधव, मनोज शेळके, शरद देशमुख, पवनकुमार
गायकवाड, राजा माने, पवन सुरवसे, कुणाल वागज, एमएच शेख, गिरीष ब्याळे, यशपाल
कांबळे, प्रविण घोटाळे, असिफ बागवान, लता मुददे, सत्यवान कांबळे, अभिजीत पतंगे, प्रभाग
अध्यक्ष संजय जगताप, अमित जाधव, गोटु यादव, सतिश सांळूके, नानसेन कामेगावकर, पप्पू
देशमुख, दत्ता सोमवंशी, विकास वाघमारे, सुमीत खंडागळे, प्रा.संजय ओव्हाळ, प्रशांत पाटील,
अयुब मणीयार, प्रा.माधव गोदकर, प्रा. साळूंके, सौरंभ खरोसेकर, उमेश पाटील, अजय पाटील,
संतोष साळूके, अमरनाथ बिडवे, प्रा. भिगोले, व्यकंट दुडीले, संजय निलेगावकर, संकेत उटगे,
अजय सिंगनाथ, संतोष पोददार, शैलेश पाटील, गणेश शिंदे, विदयासागर सोनवणे यांच्यासह
काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष, बुथ प्रमुख, कार्यकर्ते व नागरीक मोठया संख्येने
उपस्थित होते.