• Sun. Jul 13th, 2025

संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं…

Byjantaadmin

Jul 13, 2025

संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना akalkot येथे काळं फासण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि maratha समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली. येथील शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांकडून हे काळं फासण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते. दरम्यान,  प्रवीण गायकवाड यांचा आज अक्कलकोटमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र, या सत्कार समारंभाच्या ठिकाणीच त्यांना काळं फासण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याची माहिती असून पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *