गावातील जीवनमान सुधारण्यासाठी ग्रामपंचायत,
नागरिक आणि प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करावेत:
- आमदार अमित देशमुख
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते हरंगुळ खुर्द येथे
नालंदा बुद्ध विहाराचे लोकार्पण; सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन
लातूर (प्रतिनधी) : रवीवार १३ जुलै २५ :
गावातील दैनंदिन जीवनमान सुधारण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि
पाणीपुरवठ्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करुन नागरिकांनीही नाल्यात
कचरा न टाकता ठरवून दिलेल्या ठिकाणी जमा करावा, गावात अवैध दारू विक्री आणि
जुगार असे प्रकार चालू नयेत यासाठी पोलीस विभागाने काळजी घ्यावी, तसेच महिलांची
मागणी लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने दारू दुकानास परवानगी देऊ नये, यासह अनेक
महत्त्वाच्या सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जनता दरबारात
बोलताना केल्या.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी
पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी आज रवीवार, १३ जुलै रोजी सकाळी हरंगुळ खुर्द येथे भेट दिली. यावेळी त्यांनी बौद्ध
नगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या नालंदा बुद्ध विहाराचे लोकार्पण केले आणि महिला भगिनी
व गावकऱ्यांसमवेत प्रार्थना केली. मनशांती आणि मानव कल्याणासाठी तथागत गौतम बुद्धांचे
विचार अत्यंत उपयुक्त ठरणारे असून, या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी हे बुद्धविहार
उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे हरंगुळ (खुर्द) येथे आगमन झाल्यावर
त्यांच्या हस्ते दलित वस्तीतील नालंदा बौद्ध विहार सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर
गावभागातील सिमेंट कॉक्रीट रस्ता व नालीच्या बांधकाम कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार तथा विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा.
चेअरमन वैजनाथराव शिंदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, टवेन्टीवन शुगर्सचे व्हा. चेअरमन विजय
देशमुख, व्हा. चेअरमन ॲड. समद पटेल, तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, गटविकास अधिकारी
तुकाराम भालके, पोलीस निरीक्षक ज्ञानदेव सानप, संचालक बळवंत पाटील, डॉ. बालाजी वाघमारे,
अनिल दरकसे, अनंत बारबोले, परमेश्वर वाघमारे, धनंजय वैदय, विरसेन भोसले आदी
पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हरंगुळ ग्रामस्थांसह गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह श्री हनुमान मंदिरासमोरील
सभागृहात जनता दरबार घेण्यात आला. या जनता दरबारात तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी,
सरपंच, उपसरपंच, इतर महत्त्वाच्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार देशमुख यांनी
गावकऱ्यांसमवेत मोकळेपणाने संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी ऐकून घेतल्या आणि
त्यांची निवेदने स्वीकारली.
जनता दरबारात बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, गावातील दैनंदिन जीवनमान
सुधारण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वच्छता, पाणीपुरवठ्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी.
नागरिकांनीही नाल्यात कचरा न टाकता ठरवून दिलेल्या ठिकाणी जमा करावा. गावात अवैध दारू
विक्री, जुगार असे प्रकार चालू नयेत यासाठी पोलीस विभागाने काळजी घ्यावी, तसेच महिलांची
मागणी लक्षात घेता ग्रामपंचायतीने दारू दुकानास परवानगी देऊ नये, यासह अनेक महत्त्वाच्या
सूचना त्यांनी केल्या. पाणंद रस्त्या संदर्भात गावात स्थापन केलेल्या समितीने एकत्रित सर्व
प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर करावेत, ग्रामपंचायतीने सामूहिक स्मशानभूमी संदर्भातील मागणी
नोंदवावी, समाज मंदिर, तलाठी भवन तसेच इतर योजनांचे प्रस्ताव दाखल करावेत, असे सांगून हे
सर्व प्रस्ताव तातडीने मार्गी लावले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. गावकऱ्यांनी दिलेल्या सर्व
निवेदनांसंदर्भात संबंधित विभागाला पाठपुरावा करून हे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, अशी
ग्वाही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी दिली. तसेच त्यांनी उपसरपंच
श्री. आनंद पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली.
दरम्यान कार्यक्रमात हरंगुळ खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने कचरा संकलनासाठी
कचराकुंडीचे गावातील नागरीकांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास हरंगुळ खुर्द येथील
सरपंच श्रीदेवी झुजे पाटील, उपसरपंच अनंत पवार, धनराज पाटील, राजकुमार झुजे पाटील,
उमाकांत भुजबळ, तानाजी राठोड, बाबासाहेब गायकवाड, कस्तुरबाई मसलकर, संगीता चापुले,
निकीता झुंजे, शितल भुजबळ, सविता पवार, पार्वती होळकर, ज्ञानदेव होळकर, मनोहर झुजे
पाटील, शिवाजी झुजे पाटील, श्रीकांत भुजबळ, अमीर शेख, रुकमीनबाई गायकवाड, लोचनबाईल
सावळे, विमल वाघमारे, सुंदरबाई शिंदे, श्रीदेवी गायकवाड, सुनीता वाघचौडे, शंकुतला
वाघचौडे, मनिषा शिंदे, सुजानबाई गायकवाड, सविता सरवदे, अंजना घोडके, कमलबाई
गायकवाड आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी
पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद, आमदार अमित विलासराव
देशमुख यांच्या हस्ते हरंगुळ खु. येथील आयेशा मकदूम शेख यांची महावितरण मध्ये
सहाय्यक अभियंता या पदावर निवड झाले बददल सत्कार करण्यात आला.
