विलासराव देशमुख फाउंडेशनतर्फे ग्रामीण महिलांना व्यवसायाची संधी;
सौ. अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते लातूरमध्ये आठवडी बाजाराचा शुभारंभ
लातूर प्रतिनिधी:
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील महिलांना स्व-
निर्मित विविध प्रकारच्या घरगुती वापराच्या वस्तू आणि जीवनावश्यक साहित्य विक्री
करून व्यवसाय व उद्योगाला चालना देण्यासाठी आठवडी बाजाराची सुविधा उपलब्ध
करून देण्यात आली आहे. या आठवडी बाजाराचा शुभारंभ ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचालिका
सौ. अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. आठवड्यातील दर शुक्रवारी
दुपारी १ ते ४ या वेळेत शाहूपुरी कॉलनी, राजीव गांधी चौक येथील गोल्डक्रेस्ट
हायस्कूलच्या प्रांगणात हा आठवडी बाजार भरणार आहे.
महिला सक्षमीकरण आणि दर्जेदार वस्तू:
सौ. अदिती अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव देशमुख
फाउंडेशनच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील महिलांना उद्योग आणि व्यवसायातून
रोजगाराची संधी मिळावी, तसेच शहरातील ग्राहकांना दर्जेदार वस्तू माफक दरात
मिळाव्यात, या दुहेरी उद्देशाने हा आठवडी बाजार शुक्रवार दि. ११ जुलै रोजी सुरू
करण्यात आला आहे.
बाजार ठिकाण आणि वेळ:
लातूर शहरातील जूना औसारोडजवळ, शाहूपुरी कॉलनी, राजीव गांधी चौक
येथील गोल्डक्रेस्ट हायस्कूलच्या प्रांगणात हा आठवडी बाजार भरणार आहे.
आठवड्यातील दर शुक्रवारी दुपारी १ ते ४ या वेळेत ग्रामीण भागातील महिलांनी तयार
केलेले घरगुती विविध मसाले, वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे, आवळा कँडी, पापड, सुगंधी
चहा मसाले विविध खाद्यपदार्थांसह दैनंदिन वापरातील अगरबत्ती, कापडी पिशवी
इत्यादी वस्तू येथे उपलब्ध असतील. या बाजाराचा शुभारंभ झाल्यानंतर बाजाराची
पाहणी करुन विविध वस्तु ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख
यांनी खरेदी केल्या. येथील उदयमी नवउदयोजीका महीलांना शुभेच्छा दिल्या.
लातूर शहर आणि परिसरातील नागरिकांना चांगल्या गृह उपयोगीवस्तू आणि
साहित्य एकाच ठिकाणी मिळावे यासाठी या आठवडी बाजाराची सुविधा उपलब्ध करुन
देण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी या बाजाराला भेट द्यावी, असे आवाहन
ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांनी केले आहे.
