चाकूर बाजार समिती सभापती निळकंठ मिरकले पाटील भाजपात
मिरकले यांच्या नेतृत्वात दीडशे कार्यकर्तेही भाजपवासी
चाकूर/ प्रतिनिधी: चाकूर बाजार समितीचे सभापती निळकंठ मिरकले पाटील यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. मिरकले पाटील यांच्या समवेत सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी शरद पवार गटास सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला.
मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास खा. अजित गोपछडे, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, रामचंद्र तिरुके, अहमदपूरचे अमित रेड्डी, चाकू चे माजी नगराध्यक्ष कपिल माकणे, तालुकाध्यक्ष रणजीत मिरकले पाटील, सिद्धेश्वर पवार, प्रताप पाटील,सज्जनकुमार लोणाळे, युवराज पाटील, उपसभापती लक्ष्मण दंडीमे, दत्ता कलाले, बाजार समिती संचालक अजय काळे, दयानंद पाटील, राम जाधव, सौदागर शेडुळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चाकूर शहराध्यक्ष अमोल शेटे यांच्यासह अनेक गावचे सरपंच व सोसायटी चेअरमन यांची उपस्थिती होती.
अहमदपूर व चाकूर तालुक्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. दोन्ही तालुक्यांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू, असे मत निळकंठ मिरकले पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर व्यक्त केले.
