• Sat. Jul 12th, 2025

मुंबई-नांदेड वंदे भारत स्टेशनचा 7 जिल्ह्यांना फायदा; 10 स्टेशन्सचा समावेश

Byjantaadmin

Jul 10, 2025

मुंबई ते नांदेड (CSMT to Hazur Sahib Nanded) या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस (Mumbai to Nanded Vande Bharat Express) सुरू होणार आहे. मुंबई-नांदेड वंदे भारतचा मुहूर्त ठरला असून 26 ऑगस्ट 2025 पासून ही एक्स्प्रेस सुरू होणार आहे. त्यामुळे नांदेडकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भाजप नेते अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. ही ट्रेन मुंबई ते नांदेडदरम्यान (Mumbai to Nanded) 771 किलोमीटरचं अंतर तब्बल 8 तासात पूर्ण करणार असल्याची माहिती आहे.

26 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई ते हजूर साहिब नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटना दिवशी एक विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. त्यानंतर 27 ऑगस्टपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजूर साहिब नांदेड आणि 28 ऑगस्टपासून हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई असा प्रवास सुरू होईल.  आठवड्यातील गुरुवार वगळता इतर दिवस दररोज मुंबई ते नांदेड असा प्रवास करता येणार आहे. दररोज दुपारी 1.10 मिनिटांनी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी रेल्वे स्थानकांवरुन हजूर साहिब नांदेड येथे रात्री 10.50 वाजता पोहोचेल. 

नांदेड ते मुंबई (20705) किती दिवस धावणार? (nanded to mumbai stations)

28 ऑगस्ट 2025 पासून हजूर साहिब नांदेड स्थानकावरुन बुधवार वगळता दररोज सकाळी 5 वाजता वंदे भारत एक्स्प्रेस सुटेल. परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर रेल्वे स्थानकांवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी 2.25 वाजता पोहोचेल

मुंबई-नांदेड (20706) आठवड्यातील किती दिवस धावणार

आठवड्यातील गुरुवार वगळता इतर दिवस दररोज मुंबई ते नांदेड असा प्रवास करता येणार आहे. दररोज दुपारी 1.10 मिनिटांनी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी रेल्वे स्थानकांवरुन हजूर साहिब नांदेड येथे रात्री 10.50 वाजता पोहोचेल. 

नांदेड ते मुंबई (20705) किती दिवस धावणार?

28 ऑगस्ट 2025 पासून हजूर साहिब नांदेड स्थानकावरुन बुधवार वगळता दररोज सकाळी 5 वाजता वंदे भारत एक्स्प्रेस सुटेल. परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर रेल्वे स्थानकांवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी 2.25 वाजता पोहोचेल. 

Latest and Breaking News on NDTV

ही गाडी हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे अंतर 9 तास 25 मिनिटात पूर्ण करेल. या एक्स्प्रेसला 20 डब्बे असतील. ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कार असेल. जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आठ डब्बे होते. त्यात वाढ करून 20 डब्बे करण्यात आले आहेत.

https://x.com/drmned/status/1942916467122655465?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1942916467122655465%7Ctwgr%5Eb767a7ad5164c82a585a2d3edae3fafccc4ddef5%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.ndtv.com%2Fmaharashtra%2Fmumbai-to-hazur-sahib-nanded-vande-bharat-express-10-stations-starting-from-26th-august-8852831

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *