लातूर शहरात पिवळ्या आणि दूषित पाण्याचा पुरवठा
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
विधानसभेत मांडला स्थगन प्रस्ताव
मुंबई (प्रतिनधी) :
लातूर महानगरपालिकेने उन्हाळ्याच्या दिवसात केलेल्या पिवळ्या आणि दूषित
पाणीपुरवठ्याच्या संदर्भात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
शुक्रवारी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शुक्रवार दि. ११ जुलै
२५ रोजी विधानसभेत लातूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील नियोजन
शून्य कारभाराबाबत स्थगन प्रस्ताव मांडताना आमदार अमित विलासराव देशमुख
म्हणाले की, लातूर महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी उन्हाळ्याच्या दिवसात
अनेक दिवस गढूळ, पिवळ्या, रंगाच्या दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला.
त्यामुळे असंख्य नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या, या
संदर्भात अनेक वेळा सूचना करूनही पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही. या
कामात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्यावर
अद्याप कसलीही कारवाई झालेली नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात
कोणतेही नियोजन नाही आणि कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जात नाही ही बाब
अत्यंत चिंतेची असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
