निटुर येथे माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने मोफत कर्करोग व नेत्र तपासणी शिबिर संपन्न
निलंगा /प्रतिनिधी : निलंगा तालुक्यातील निटूर येथील नाथ विठ्ठल रुखमाई संस्थान मंदिरात लातूर जिल्हा माहेश्वरी महीला संघटन व विवेकानंद हॉस्पीटल लातूर यांचा संयुक्त विद्यमाने निशुल्क कर्करोग (कॅन्सर ) तपासणी शिबीर व नेत्र चिकित्सा शिबीर दिनांक ८ जुलै २०२५ रोजी संपन्न झाले.शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. विरनाथ लड्डा महाराज होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणुन निटूर पोलीस चौकीचे बिट अंमलदार सुधीर शिंदे, सरपंच प्रतिनिधी प्राचार्य अनिल सोमवंशी- पाटील, पत्रकार राजकुमार सोनी, पत्रकार विजयकुमार देशमुख, निटूर सोसायटी चे व्हाईस चेअरमन दिनकर (नाना) निटूरे, डॉक्टर बाजीराव जाधव, डॉक्टर मिथिला बिरादार, सुजीत बोरसुरीकर आदीची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रजलन झालानंतर सर्व प्रमुख पाहुणे यांचा लातूर जिल्हा माहेश्वरी महीला संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मंगल लड्डा, सचिव ललीता राठी, स्वास्थ समिती प्रमुख वंदना दरक, रचना बियाणी, अर्चना खटोड, निर्मला सोमानी, अर्चना लोया यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर नाथ विठ्ठल रुखमाई संस्थानचा वतीने माहेश्वरी महीला भगीनी एक समाजहिताचे कार्य करीत आसलामुळे ह.भ.प. विरनाथ लड्डा, पत्रकार राजकुमार सोनी, मल्लानाथजी लड्डा, लक्ष्मण मगर, ह भ प हरीभाऊ सोमवंशी यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. या मोफत तपासणी शिबिरात विवेकानंद हॉस्पीटलचे डॉ बाजीराव जाधव, डॉ मिथीला बिरादार, जनसंपर्क प्रमुख सुजीत बोरसुरीकर, शिबीर प्रमुख कपिल वाघमारे, टेक्नीशियन सचिन मानकोसकर, दुर्गा रसाळ, टेक्नीशयन राजश्वरी सुराना, राजश्री मेटे, ज्ञानेश्वर बनसोडे, प्रसाद भोसले यांनी सर्व रुग्नांची आतीशय काळजीपूर्वक तपासणी केली. तसेच या मोफत कर्करोग व नेत्र तपासणी शिबिराचा निटुर व निटुर परिसरातील डांगेवाडी, कलांडी,बुजरुगवाडी, ताजपुर, शेंद, मुगाव, मसलगा आदी गावातील शेकडो रुग्नानी निशुल्क शिबिराचा लाभ घेतला. व मोठ्या उत्साहात हे शिबीर संपन्न झाले.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी पत्रकार राजकुमार सोनी, मल्लनाथजी लड्डा, विरनाथ लड्डा, गोरखनाथ लड्डा, हरीभाऊ सोमवंशी, शब्बीर शेख, सुधाकर पोतदार, वामन मानकोसकर, आनंत पाटील, सतीश बसवणे, विठ्ठल पाटील, शिवाजी शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
