‘लातूर ग्रामीण’मध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम
आमदार धिरज देशमुख यांच्याकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन; ७७ पैकी तब्बल ५८ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा
—
लातूर : काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या लातूर ग्रामीण मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व कायम असून ७७ पैकी तब्बल ५८ गावातील ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे तर ६७१ पैकी तब्बल ५०३ उमेदवार विजयी झाले आहेत. याबद्दल माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री. अमित विलासराव देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
रेणापूर तालुक्यातील ३३ गावापैकी आसराची वाडी, इंदरठाणा, इटी नागापूर, कामखेडा, कारेपुर/ गोपाळवाडी, कोळगाव, कोष्टगाव/ रामवाडी/ सुकणी/ लहानेवाडी, गरसुळी, गोढाळा, जवळगा, टाकळगाव, दिघोळ देशमुख/ डिघोळ देशपांडे, धवेली, निवाडा, पोहरेगाव, माणूसमारवाडी, मुरढव, लखमापुर, समसापुर, सय्यदपूर बू, सांगवी, सुमठाणा, हरवाडी या २३ गावात काँग्रेस विचाराचे सरपंच निवडून आले आहेत. तसेच, २८३ पैकी तब्बल २२५ उमेदवार विजयी झाले आहेत.
लातूर ग्रामीण मतदारसंघांतर्गत लातूर तालुक्यात ३१ पैकी आखरवाई, कारसा, कासारखेडा, गांजुर ताडकी, चिंचोली ब, चिखलठाणा, टाकली ब, ढाकनी, पिंपरी अंबा, बिंदगीहाळ, बोपला, बोडका वाकडी, भातखेडा, भोईसमुद्रगा, भोसा, ममदापूर, मळवटी, मांजरी, येळी, रुई दिडेगाव, शिऊर, शिवणी खू, सलगरा खू, सोनवती या २४ गावात काँग्रेस विचाराचे सरपंच निवडून आले आहेत. तर काँग्रेस विचाराची कोळपा ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तसेच, २७५ पैकी १७६ उमेदवार विजयी झाले आहेत.
लातूर ग्रामीण मतदारसंघांतर्गत औसा तालुक्यात १३ पैकी अंदोरा, उटी बू, कवठा केज, काळमाथा, जायफळ, बिरवली, येल्लोरी, वानवडा, शिवली, गुळखेडा/रिंगणी १० गावात काँग्रेस विचाराचे सरपंच निवडून आले आहेत. तसेच, ११३ पैकी ९३ उमेदवार विजयी झाले आहेत. या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
—-
आता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध रहा
आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी सांगत असत की, “राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते असते. निवडणूक संपली, त्याचक्षणी राजकारण संपले.” हा विचार समोर ठेवून, सर्वांना बरोबर घेत आपण एकोप्याने आता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध रहावे, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.
—