दिग्गजांना धक्का देत नवीन चेहरे बनले कारभारी
निलंगा (प्रतिनिधी):-निलंगा तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींमधील थेट सरपंच पदाचे तर सदस्यपदाच्या 497 जागांसाठी सोमवार दुपारी सर्व ग्रामपंचायतींचे निकाल घोषीत झाले. अत्यंत अति तटीच्या झालेल्या निवडणुकीत तालुक्यात भाजप व काँग्रेसला समान संधी मतदारांनी दिल्याचे दिसून येत आहे तर मतदारांनी तरूणांना संधी देत अनेक दिग्गजांना धक्का दिला असून ग्रामपंचायतीत नवीन चेहरे कारभारी म्हणून काम पाहणार आहेत. या निवडणुकीत अनेक ठिकाणी नवख्यांना व तरुणाना संधी मतदारांनी दिली आहे तर काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत मतदारांनी परिवर्तन केले यात काही मोठ्या ग्रामपंचायतचे निकाल अनपेक्षित लागले असून उपसरपंच पदासाठी रस्सीखेच होणार आहे.
निलंगा शहराला लागत असलेल्या दापका ग्रामपंचायत निवडणूकित भाजपने प्रतिष्ठापणाला लावली होती .परंतु काँग्रेसचे लाला पटेल यांनी सलग तिसरा विजय संपादन करून हॅट्ट्रिक केली येथे भाजपला मतदारांनी नकार दिल्याचे दिसून आले .जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांच्या शेडोळ या ग्रामपंचायतीत जि .प चे माजी सदस्य व्यंकटअप्पा धुमाळ यांनी बाजी मारली आहे.
अंबुलगा बु येथे भाजप ला मतदारांनी नकारात्मक प्रतिसाद दिला . हलगरा येथे अनपेक्षित निकाल समोर आलं आहे.माकणी थोर येथेही भाजपला पराभव पत्करावा लागला तर मुगाव येथील काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला पानचिंचोली इथलं काँग्रेसचा गड शाबीत ठेवण्यात अभय साळुंखे यांना यश प्राप्त झाले आहे हंगारगा सिरसी येथे अंबादास जाधव यांनी विजयी हॅट्ट्रिक केली.मदनसुरी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या पॅनल ला मतदारांनी नाकारले आहेत. बेडगा येथे सत्यवान धुमाळ यांचे पॅनल ने विजय मिळविला. नेलवाड येथे उद्धव ठाकरे शिवसेना गटाने विजय मिळवून सेनेची इन्ट्री केली.मुगाव,शेंद, काटे जवळगा हलगरा ,हडगा उ,येथे ग्रामपंचायतमध्ये मतदारांनी नवख्यांना संधी दिली आहे