काटे जवळगा गाव विकास पॅनलचा दणदणीत विजयी
निलंगा:-तालुक्यातील बहुचर्चित काटेजवळगा-केदापुर येथील गाव विकास पॅनल ने दणदणीत विजयी मिळविला आहे.
सरपंच पदा साठी शरद बब्रुवान सोमवंशी हे जवळपास एक हजार मतांनी विजयी प्राप्त केला आहे. तर 10 सदस्य ही पॅनल चे मताधिक्यने निवडून आले आहेत .या पूर्वी एक सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
शिवसेनेचे नेते लिंबन महाराज रेशमे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने , उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य ,तालुका प्रमुख अविनाश रेशमे यांच्या आदेशानुसार शिवसेना निलंगा शहर महिला संघटिका दैवता सगर यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले .गावातील मतदारांचे दैवता सगर यांनी आभार व्यक्त केले आहेत.