निलंगा तालुक्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व 40 ग्रामपंचायत सरपंचासह सह 6 बिनविरोध ग्रामपंचायत काँग्रेस पक्षाच्याच
-अशोकराव पाटील निलंगेकर
निलंगा- निलंगा तालुक्यामध्ये झालेल्या 62 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या 40 ग्रामपंचायत तर बिनविरोध 6 ग्रामपंचायत आल्या आहेत.स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या विचारधारेवर पुन्हा एकदा काँग्रेस एक नंबरवर आले असून बऱ्याच ठिकाणी पुरोगामी व भाजप विरोधी ग्रामपंचायती निवडून आल्या असून जुलुमी दडपशाही,धनशक्तीच्या विरोधात जनतेने काँग्रेस पक्षाच्या बाजूने कौल दिला असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या व नगर परिषदेच्या निवडणूका या काँग्रेस पक्षाच जिंकेल, पुन्हा एकदा हा तालुका काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ला आहे हे निवडणुकीवरून सिद्ध झाले आहे. असे अशोक पाटील निलंगेकर म्हणाले.लवकरच नवनिर्वाचित सरपंच व सदस्याचे भव्य सत्कार व मेळावा सर्वांना माहिती देऊन जाहीर करणार असे अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले.
यावेळी सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रचंड गर्दी अशोक बंगला येथे केली.
सर्व निवडून आलेल्या सरपंचाचे व सदस्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी सभापती अजित माने,तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील,माजी नगराध्यक्ष हमीद शेख ,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक अध्यक्ष अमोल सोनकांबळे, नगरसेवक सिराज देशमुख,प्रकाश बाचके,व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडून आलेल्या ग्रामपंचायती मध्ये दापका,हलगरा,अंबुलगा बु.,येळनूर,गुंजरगा, चिलवंतवाडी, मिरगळी,औंढा,रा.मुदगड, लिंबाळा,गव्हाण,धानोरा,जेवरी,जाऊ,उमरगा(हा),राठोडा,पानचिंचोली,हासोरी(खु)तळीखेड, सिंदखेड,सिरसी (ह),माकनी,तांबला,शेंद, हलसी हत्तरगा, हरीजवळगा, मदनसुरी, भूतमुगली, हलसी तुंगाव,मसलगा,कोतल शिवणी, चिंचोडी,सिंधी जवळगा,हरी जवळगा, हणमंतवाडी,बोटकुल, हासोरी(खुर्द)उमरगा,सोनखेड, तगरखेडा,जामगा,अनसरवाडा,कलाडी, मानेजवळगा, बोरसुरी,सिरसी(वाडी),ममदापूर, हे ग्रामपंचायत काँग्रेसचे असल्याचे दावा त्यांनी केला.
निलंगा तालुक्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व 40 ग्रामपंचायत सरपंचासह सह 6 बिनविरोध ग्रामपंचायत काँग्रेस पक्षाच्याच -अशोकराव पाटील निलंगेकर
