• Thu. Jul 10th, 2025

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडू -माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची माहिती 

Byjantaadmin

Jul 6, 2025

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडू -माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची माहिती 

हाडोळती येथील  शेतकरी पवार कुटुंबाची घेतली भेट

लातूर दि. ६. शेतकऱ्यांना शेतकरी हा सुखी आहे असा गैरसमज सरकारचा असून वस्तुस्थिती वेगळीच असून पवार कुटुंबा सारखे अनेक शेतकरी राज्यात आहेत त्यांच्याशी समस्या सुटाव्यात यासह कर्जमाफी व्हावी यासाठी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथे बोलताना दिली ते रवीवारी अंबादास पवार यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी आस्थेवाईकपणे चौकशी केली त्यावेळी ते बोलत होते 

*पत्रकारांचे केले अमीतजी देशमुख यांनी कौतुक*

यावेळी बोलताना आमदार अमित देशमुख यांनी राज्यभर हाडोलती येथील अंबादास पवार यांची   असलेली आर्थिक परिस्थिती मशागतीचे वास्तव्य चित्र प्रसार माध्यमांनी  दाखवले असून त्याची दखल  सरकारला घावी लागली त्याबद्दल पत्रकार मंडळीचे त्यांनी कौतुक करत  पत्रकारांमुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे असे सांगून शेतकरयांना अधिक सुलभ सोयी कशा मिळतील यासाठी राज्य सरकारकडे मीं पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी माजी आमदार वैजनाथराव  शिंदे, ट्वेंटी वन चें उपाध्यक्ष विजय देशमुख,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी,अभय साळुंके ,संजय पवार,चंद्रकांत मद्दे, संजय मिरजगावे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *