अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी शासनाचा दिलासा – डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पुढाकाराने मदत जाहीर
लातूर शहर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत. या संकटसमयी डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे तातडीने मदतीसाठी विनंती केली होती. त्यांच्या पुढाकारामुळे शासनाने त्वरित निर्णय घेत नुकसानभरपाई जाहीर केली आहे. यामध्ये बाधितांना प्रत्येकी दहा हजार रुपये डीबीटी अंतर्गत बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत.
याबद्दल माध्यमांशी बोलत असताना डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी
निसर्गाच्या संकटसमयी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, तातडीने निर्णय घेणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितजी पवार, महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, मदत व पुनर्वसन मंत्री मा. श्री. मकरंदजी पाटील, तसेच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मन:पूर्वक आभार मानले
