उदगीर शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा- मुख्याधिकारी यांना महाराष्ट्र जनएकता संघटना ची मागणी
उदगीर:-महाराष्ट्र जनएकता संघटना उदगीरच्या वतीने.नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन देवन मागणी करण्यात आली की उदगीर शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे असून सदर हे मोकाट कुत्रे पाई व वाहनावर येणारे जानारे नागरिकांना चावा घेत आहेत तसेच शहरातील ठिकठिकाणी वयोवृद्ध नागरिकांना व विद्यार्थ्यांना मागून येऊन मोकाट कुत्रे चावत आहेत त्या करीता मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की उदगीर शहरातील मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून उदगीरकरांना न्याय देण्यात यावे,अन्यथा आम्ही महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने लातूर जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आंदोलन करू असे सांगण्यात आलेले आहे,निवेदन घेताना महाराष्ट्र जनएकता संघटने चे उदगीर तालुका अध्यक्ष सिकंदर भैय्या शेख,प्रा राजेश चव्हाण उत्तम बिरादार शहर अध्यक्ष नोमान.सय्यद शहर उपाध्यक्ष वजिर सय्यद शहर उपाध्यक्ष इस्माईल मनियार शहर उपाध्यक्ष अभिजीत तोरे सल्लागार चृकांत कस्तुरे इ.कार्यांकर्त उपस्थिती होते..!
