• Sat. Jul 12th, 2025

लातूर शहरातील प्रभाग क्रं. १७ मधील नागरी समस्यांची  सोडवणूक करण्याची मनपा आयुक्तांकडे मागणी  अन्यथा २० जुलै  पासून नाईक चौकात आमरण उपोषण करणार : विवेक साळुंके 

Byjantaadmin

Jul 6, 2025

लातूर शहरातील प्रभाग क्रं. १७ मधील नागरी समस्यांची  सोडवणूक करण्याची मनपा आयुक्तांकडे मागणी  अन्यथा २० जुलै  पासून नाईक चौकात आमरण उपोषण करणार : विवेक साळुंके 

लातूर :  लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरी समस्यांची तात्काळ सोडवणूक करावी, दिवसेंदिवस वसंतराव  नाईक चौकात अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यामुळे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक माधवराव साळुंके यांनी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे. या समस्यांची सोडवणूक न झाल्यास दि. २० जुलै २०२५ पासून नाईक चौकात लोकशाही पद्धतीने आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही साळुंके यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. 

     मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात विवेक माधवराव  साळुंके यांनी असे नमूद केले आहे की, प्रभाग क्रं . १७ मधील एलआयसी कॉलनी, विशाल शाळेच्या पाठीमागे तसेच बलदवा  नगर परिसरातील रस्त्यावर तात्काळ मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्यात यावा. याच प्रभागातील सर्व्हे नं . १२,१३, १४, १५, १८ ते २० मधील एनए लेआऊट मधील ग्रीन बेल्ट तात्काळ ताब्यात घेऊन कंपाउंड करण्यात यावे. एलआयसी – बलदवा नगर भागातील इंद्रायणी नगर,  श्रद्धा नगर, ज्ञानेश्वर नगर आदी भागातील वाढत्या वस्त्यांना वेळेवर पाणीपुरवठा होऊ शकत नाही. नळाला पाणी आले तरी ते पूर्ण दाबाने येत नसल्याने लोकांना पाणीच मिळत नाही. त्यासाठी  या परिसराकरिता एक स्वतंत्र पाण्याची टाकी उभारण्यात यावी. प्रभागातील बऱ्याच भागात अनेक दिवसांपासून घंटा गाडी येत नाही.त्यामुळे परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाल्याचे पाहायला मिळते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साचलेल्या कचऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभागातील विजेची समस्याही मागच्या काही दिवसात वाढीस लागली आहे. त्याकरिता विद्युत विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विजेच्या समस्येचीही सोडवणूक केली जावी. प्रभागातील अशा विविध नागरी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मनपा कार्यालयाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र त्यावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. या निवेदनावरही तात्काळ योग्य ती कार्यवाही न केली गेल्यास परिसरातील नागरिकांसह आपण दि. २० जुलै २०२५ पासून नाईक चौकात आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही विवेक साळुंके यांनी दिला आहे. यावेळी  विवेक साळुंके यांच्यासह  कमलाकर शिंदे, आदित्य शिंदे, ऋषिकेश सूर्यवंशी, महेश करवंदे, पपीता रणदिवे, दयानंद मुळे , वीरभद्र स्वामी,  नागेश सारगे, प्रशांत गायकवाड, सादिकभाई पठाण, रणजीत  मोहिते   व एलआयसी कॉलनीतील महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *