उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची बाई – काकाजी उद्योग समूहास सदिच्छा भेट
लातूर : राज्याचे उद्योग, सा.बां. तथा पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपल्या लातूर जिल्हा दौऱ्यात शनिवारी लातूर शहरातील बाई – काकाजी उद्योग समूहास सदिच्छा भेट दिली.
आपल्या या भेटीमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी बाई – काकाजी उद्योग समूहाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या पॉलिमर व सनरीच अॅक्वाच्या प्लांटच्या अद्यावत मशिनरी व तंत्रज्ञानाची माहिती घेतली. सनरीच अॅक्वाने अल्पावधीत आपल्या गुणवत्तेमुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील विविध राज्यातील नागरीकांचा विश्वास जिंकल्याबद्दल त्यांनी कौतूक केले. सातत्यपूर्ण गुणवत्ता टिकवून ठेवल्यामुळे सनरीच अॅक्वाचा ब्रँड येणाऱ्या काळात भारताचा एक गुणवत्तेने परिपूर्ण ब्रँड म्हणून नावारूपाला यावा, अशा शुभेच्छाही नाईक यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी बाई – काकाजी उद्योग समूहाचे संस्थापक प्रमोद मुंदडा यांनी आपल्या उद्योग समूहा विषयी राज्यमंत्री नाईक यांना विस्तृत माहिती दिली. मुंदडा व बाई – काकाजी उद्योग समूहाच्या वतीने राज्यमंत्री नाईक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बालकिशनजी मुंदडा यांच्यासह प्रमोद मुंदडा, आकाश मुंदडा, अक्षय मुंदडा, प्रज्योत मुंदडा, कृष्णा मुंदडा, प्रणव मुंदडा, पुसदचे उद्योजक कन्हैया बजाज आदी मान्यवरांची उपस्थिती होती
