• Sun. Jul 6th, 2025

लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याचं आजपासून वितरण सुरु

Byjantaadmin

Jul 5, 2025

महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण आजपासून सुरु करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे.  या योजनेचा 12 वा हप्ता महिलांच्या खात्यात या निमित्तानं जमा होईल. आदिती तटकरे यांनी जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.  

आदिती तटकरे यांची सोशल मीडिया पोस्ट 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे.

महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे ,  उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या…

लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 29 जूनला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी 3600 कोटी रुपये डीबीटीवर वर्ग करण्यात आल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम आज (5 जुलै)पासून वर्ग करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *