शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या मागणी वरून लातूर मदनसुरी कासार शिरशी बस चालू
निलंगा:- शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब हे मौजे मदनसरी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवासी असून सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. मदनसुरी हे त्यांचे मूळ गाव हे गाव लातूर जिल्ह्यापासून 75 किलोमीटरच्या अंतरावर असून कासार शिरशी ही एक मोठी बाजारपेठ असून कासार शिरशी पासून शंभर किलोमीटर अंतरावर लातूर शहर आहे .लातूर शहरांमध्ये शिक्षणासाठी असणाऱ्या विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक दैनंदिन जिल्हा कामासाठी ये जा करणारे नागरिक दवाखान्यासाठी जाण्यासाठी एक चांगला पर्याय बस सेवा आहे हे लक्षात घेवून शिवाजी माने यांनी राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीमान जानराव साहेब यांच्याकडे डिसेंबर 2024 मध्ये लातूर ते औसा, लामजना ,किल्लारी, कवठा पाटी, मुदगड एकोजी ,सरवडी, हाडोळी, मदनसुरी, लिंबाळा मोड, भुतमूगळी ,जवळगा, हसोरी, कासार शिरशी मुक्काम अशी बस सेवा सुरुवात करावी अशी मागणी केलेली होती.
या मागणीला आज दिनांक 03 जुलै 2025 रोजी यश आले .आज 03 जुलै 2025 रोजी वरील प्रमाणे मागणी केलेली बस आज रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी मदनसुरी येथे दाखल झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब स्वतः हजर राहून सदरील बसची पूजा करून या बसवर सेवा देणारे वाहक व चालक यांचा सत्कार केला .तसेच गावातील नागरिकांना व ज्या मार्गे बस सेवा सुरू झालेली या सर्व गावकऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी विनंती केली की ,सुरक्षित असा प्रवास अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणून अवैध्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवास न करता परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा परिवहन महामंडळाकडून अत्यंत चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत .राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना जेष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, मुलींना मोफत प्रवास, महिलांना 50 टक्के सवलत अशा अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्या सर्व अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहेत. या सर्व योजनांचा लाभ वरील मार्गे चालू असलेल्या सर्व गावकऱ्यांनी घ्यावा व बस वाहक चालक यांना सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक सहाय्यक निरीक्षक व्यंकटराव बिराजदार यांनी शासनाच्या विविध योजना परिवहन महामंडळामार्फत राबवल्या जात असून या सर्व योजनांचा नागरिकांनी फायदा घ्यावा. तसेच जिल्ह्याच्या राजकारणात सक्षमपणे प्रभाव टाकणारे सुपुत्र या गावचे नागरिक असलेले आमचे वडील भावाप्रमाणे वागणूक देणारे आमच्या संकट समई धावून येणारे श्रीमान शिवाजीराव माने साहेब हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करीत असताना आपल्या गावासाठी नेहमीच धडपडत असतात. त्यातलाच हा एक भाग आज सदरील बस शिवाजीभाऊ माने यांच्यामुळे सुरू झाली. गावाप्रती अशी चांगली भावना असणारे भाऊ आहेत .भाऊ बद्दल अत्यंत आदर आमच्या मनात असून राजकारणात आदरणीय शिवाजी माने साहेबांसारखे लोक असणं अत्यंत गरजेचं आहे .आणि परिवहन महामंडळाच्या वतीने सर्व नागरिकांना चांगल्या पद्धतीने सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत या सेवेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे मत व्यंकटराव बिराजदार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आबासाहेब शिंदे सतीश राव पवार राष्ट्रीय कर्मचारी सेना जिल्हाध्यक्ष, तसेच किरण पाटील, मदनसुरी गावातील उपसरपंच धनराज जाधव, अशोक सूर्यवंशी, अशोक जाधव दिलीप जाधव ,गोविंद माने ,माधव शिंदे, वेंकट राजे, आकाश शिंदे ,गुलाबराव माने, राहुल जाधव, वैभव माने, सचिन जाधव ,महेश कोतापुरे, बस चालक कांबळे ,सूर्यवंशी, विकास जाधव, प्रकाश मुगळे, सुधाकर दादा माने यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदनसुरी गावचे माजी सरपंच अशोकराव जाधव यांनी केले.
