बोगस बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल करा व बियाने प्रमानित करणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करा अन्यथा तीव्र आंदोलन.
निलंगा- शेतकऱ्यास बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करा व बियाणे प्रमाणित करणाऱ्या अधिकार्यास तात्काळ निलंबित करावे अशा आशयाचे निवेदन शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दिले. निलंगा तालुक्यातील खरीप 2025 साठी निलंगा तालुक्यात शंभर हेक्टर वरील पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. कृषी विभागाला विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी निवेदन देऊन सुद्धा कृषी कार्यालयाकडून बियाणे तयार करणाऱ्या कंपनीची चौकशी करण्यात आली नाही. महाबीज, ओ डी एस एफ, महागुजरात इत्यादी कंपन्यांनी पुरवलेले सोयाबीनचे बियाणे याची उगंवन क्षमता 70% च्या वर नसल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. कृषी विभागाचे बियाणे प्रमाणीकरण करणारे अधिकारी आहेत त्यांनी योग्यरीत्या परीक्षन न करता बियाणे कंपनीस बियाणे प्रमाणित असलेले परवानगी दिल्यामुळे बोगस बियाणे बाजारात आले त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अशा बोगस बियाणे कंपन्यावर गुन्हे दाखल करावे व प्रमाणित बियाणे आहे म्हणून परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याना तात्काळ निलंबित करावे व शेतकऱ्यावर दुबार पेरणीसाठी संकट आल्यामुळे कंपनीकडून तात्काळ हेक्टरी वीस हजार रुपये द्यावे अन्यथा शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. सोबत तालुकाप्रमुख शिवाजी चव्हाण, तालुका संघटक शिवाजी पांढरे, महिला तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, शहर प्रमुख दैवता सगर, महिला तालुका संघटक रिहाना शेख, सविता पांढरे माधव मोरे,सतीश शिंदे इत्यादी उपस्थित होते.
