महाराष्ट्र विद्यालयाची भारतीय मानक ब्युरो (बी आय एस) पुणे द्वारा औद्योगिक क्षेत्रभेट संपन्न
निलंगा – लातूर येथील पार्श्वनाथ पॉलिमर इंडस्ट्री एमआयडीसी लातूर या ठिकाणी महाराष्ट्र विद्यालय, निलंगा या शाळेची भारतीय मानक ब्युरो, पुणे यांच्या सौजन्याने औद्योगिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शाळेच्या 28 विद्यार्थ्यांना प्लास्टिक पाईप चा कारखाना प्रत्यक्ष पाहायला मिळाला. यामध्ये कच्च्या मालापासून पक्का माल कसा बनतो, शेतीसाठी उपयुक्त व शहरातील पाणीपुरवठा यासाठी वापरण्यात येणारे पाईपलाईन कशा प्रकारे तयार केले जाते, यांचे प्रत्यक्षदर्शी नमुने पहावयास मिळाले. यासाठी बी. आय. एस. चे जिल्हाप्रमुख श्री. खंडागळे सर व पार्श्वनाथ पॉलिमर चे मालक उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे सर्व पाहावयास मिळाले. सोबत शाळेचे बी आय एस मेंटॉर श्री. हाशमी सर व प्रयोगशाळा सहाय्यक अरुण पाटील हेही उपस्थित होते. भारतीय मानक ब्युरो यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली ही औद्योगिक क्षेत्रभेट प्रवास खर्च व पंचपक्वान्न भोजनासह मोफत होती. क्षेत्रभेट यशस्वी संपन्न झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री मोहन नटवे सर, उप मुख्याध्यापक डी. डी. पवार सर, पर्यवेक्षिका सौ एस. डी. देशमुख मॅडम व सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले.*
