महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट शेतकरी आणि सामान्य माणसांना कसे जगावे हा प्रश्न पडलाय!
विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा सरकारच्या कारभारावर घणाघात
मुंबई (प्रतिनिधी):महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे या परिस्थितीत कसे जगावे हा शेतकरी आणि सामान्य माणसांसमोर प्रश्न पडलाआहे असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत त्यांनी बोलताना म्हटले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू आहे,
पवनचक्की बसवणाऱ्या कंपनीकडून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना मारहाण होत असून, पोलीस अधिकारीही शेतकऱ्याऐवजी कंपनीच्या लोकांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आज विधानसभेत उपस्थित झाली तेव्हा शासनाकडे यासंबंधीची कसलीच माहिती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. या संदर्भाने सुरू असलेल्या चर्चेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सहभाग घेतला. पवनचक्की बसवणाऱ्या कंपनीकडून महाराष्ट्रात
शेतकऱ्यांची अडवणूक होतेय, पिळवणूक होतेय, त्यांना मारहाण होतेय, जे हे
सर्व करतायेत त्यांना पोलीस अधिकारी पाठीशी घालतायेत, यासंबंधी कुठलीच
माहिती शासनाकडे उपलब्ध नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असे नमूद करून
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे काय? असा प्रश्न आमदार
अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला,
पवनचक्की कंपनीचे लोक शेतकऱ्यांना मारहाण करीत असतील, पोलीस अधिकारी
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नसतील तर महाराष्ट्रात कायदा आणि
सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट आहे हे स्पष्ट होत आहे . त्यामुळे शेतकरी
आणि सामान्य माणसाला राज्यात कसे जगावे असा प्रश्न पडला असल्याचेही त्यांनी म्हंटले.
धाराशिव जिल्ह्यात कोणत्या कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना मारहाण केली,
ज्या शेतकऱ्यांना मारहाण झाली त्यांचे नाव आणि ज्या पोलिस अधिकाऱ्याने
शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला नाही या संदर्भाने संपूर्ण माहिती मागवून
घेऊन ती संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी सभागृहात सादर करावी अशी मागणी
यावेळी आमदार देशमुख यांनी केले .
