• Sat. Jul 12th, 2025

बसवकल्याण क्षेत्र समितीची मासिक बैठक संपन्न

Byjantaadmin

Jul 5, 2025

बसवकल्याण क्षेत्र समितीची मासिक बैठक संपन्न

निलंगा : —  महाराष्ट्र सिमेलगतच्या महात्मा बसवेश्वर आणि बसवादी शरणांची कर्मभूमी, शरणभूमी असलेल्या कर्नाटकातील बसवकल्याण येथे गुरुवार दि 3/7/2025 रोजी बसवकल्याण क्षेत्र समितीची मासिक बैठक संपन्न झाली.. बसवकल्याण येथे सुमारे 650 कोटी रुपये खर्चुन तयार होत असलेल्या भव्य ऐतिहासिक नूतन अनुभव मंटप वास्तूचे भव्य लोकार्पण डिसे. 2027 ला होणार आहे. त्याचे जनजागरण करण्यासाठी या बैठकाचे आयोजन दर महिन्याला केले जाते. कन्नड सह, मराठी, तेलगू, भाषेत प्रचारसाहित्य माहितीपत्रकाचे विमोचन भालकी येथील मठाधिपती पूज्य डाँ. बसवलिंग पट्टदेवरु अप्पाजी,  पूज्य शिवानंद स्वामी, बसवराज पाटील सेडाम, डाँ अमरनाथ सोलपुरे, सज्जनकुमार लोनाळे यांच्या हस्ते करण्यात आले.विविध राज्य आणि जिल्ह्यात लिंगायत आचरण, वचनपठण, इष्टलिंग साधना इ. उपक्रम घेणे.   विविध भाषेत प्रचारसाहित्य तयार करणे. विविध जिल्हा आणि प्रदेशात बैठका लावणे.  1 लाख 96 हजार सामूहिक लिंगपूजेसाठी सदस्य नोंदणी करणे. 

बसवकल्याण दर्शन साठी माहिती देणारे विविध भाषिक गाईड तयार करणे यापुढील मासिक बैठक लातूर येथे 7 ऑगस्ट 2025 रोजी घेणे. इ ठराव करण्यात आले. या बैठकीला  क्षेत्र समितीचे सदस्य चन्नबसवन्ना बळते, सुभाषचंद्र नागराळे,डाँ. सोमनाथ याळवार,  सुनिल हेंगणे, शंकरप्पा पाटील, डाँ. महेश पाटील, योगेश स्वामी, इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *