गुड मॉर्निंग मैत्री ग्रुपच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
निलंगा (प्रतिनिधी):- येथे गुड मॉर्निंग मैत्री ग्रुपच्या वतीने शासकीय विश्राम गृह, निलंगा येथे कु. समृध्दी वाघमारे, श्रीराम मोरे, सुनिल पेठकर, बस्वराज स्वामी, प्रणव अलमले, गायत्री मोरे दहावी, बारावी, सी.ई.टी. निट, जे.ई.ई.व पदवीमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष चाँदपाशा मुल्ला हे होते तर प्रमुख पाहुणे विनोद कुलकर्णी, अजय मोरे सर, डॉ. चंद्रशेखर अलमले, विठ्ठल चांबरगे सर उपस्थित होते. यावेळी गुड मॉर्निंग ग्रुप चे सदस्य डॉ. मन्मथ गताटे, लक्ष्मण फुलसुंदर, माधव पेठकर सर, राजेश केमकर, सुलतान मुल्ला, गजानन सुरवसे, सुधाकर म्हेत्रे, अॅड. पाटील साहेब, दत्ता वाघमारे, दत्ता पेठकर, संतोष धुमाळ, संतोष स्वामी, महेबुब शेख, घोलप साहेब, जगताप साहेब इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन माधव पेठकर सर यांनी केले व आभार राजेश केमकर यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष धुमाळ, लक्ष्मण फुलसुंदर, गजानन सुरवसे आदि यांनी परिश्रम घेतले.
