निलंगा विधानसभा 58 पैकी 43 ग्राम पंचायत भाजपच्या ताब्यात-अरविंद पाटील निलंगेकर
निलंगा:- निलंगा विधानसभा मतदार संघातील निलंगा तालुका 39 पैकी 27 ,शिरूर अनंतपाळ तालुका 11 पैकी 9,देवणी तालुका 8 पैकी 7 असे एकूण 58 ग्रामपंचायत पैकी 43 ग्रामपंचायती आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे निवडून आले असल्याची माहिती भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निलंगा तालुक्यातील निटूर, अनसरवाडा, सिंदखेड अपक्ष,वडगाव, शेडोळ, तुपडी,माने जवळगा, हलगरा अपक्ष,झरी,जामगा, सिंधी जवळगा, दादगी, हमनंतवाडी हा,सिरसी हंगारग, बोरसुरी,मुगाव, राठोड, काटे जवळगा, सोनखेड, कोतल शिवणी, बेडगा, चिंचोडी, तांबरवाडी, शेळगी, हणमंतवाडी अबू, कलाडी, तालिखेड, बोटकूळ, या गावाचे सरपंच सदस्य आमदार निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत व भेट सुद्धा घेतली असल्याचे युवा नेते अरविंद पाटील म्हणाले. या नुतून सरपंच सदस्य यांचा सत्कार ही करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले
नुतून ग्रामपंचायतीला केंद्र सरकार व राज्य सरकार च्या योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचे शेवटी अरविंद पाटील म्हणाले. या वेळी दगडू साळुंखे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी उपाध्यक्ष कोळले मनोज,माजी सभापती इरफान सय्यद, शेषराव ममाळे,भाजप तालुका अध्यक्ष शाहूंराज थेटे, तानाजी बिरादार ,संजय दोरवे आदी उपस्थित होते.