• Wed. Jul 2nd, 2025

लातूर शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी हरिभाऊ सगरे यांची पुनश्च निवड

Byjantaadmin

Jul 1, 2025

लातूर शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी हरिभाऊ सगरे यांची पुनश्च निवड

 निलंगा:-(प्रतिनिधी)

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन कार्यकारणी मध्ये शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई येथून लातूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह आज हरिभाऊ सगरे यांची उपजिल्हाप्रमुख निलंगा विधानसभा पदावर फेर निवड करण्यात आली आहे. 

     मागील 27 वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये कार्यरत असलेले शिवसेनेचे कडवट शिवसैनिक म्हणून ज्यांची निलंगा तालुक्यासह जिल्हाभरामध्ये ओळख आहे असे हरिभाऊ सगरे यांची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदावर निवड करून एका कडवट शिवसैनिकाला न्याय देण्याचे काम शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी सह संपर्कप्रमुख नामदेव मामा चाळक यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या यात निलंगा विधानसभा कार्यक्षेत्रासाठी उपजिल्हाप्रमुख पदावर निलंगा तालुक्यातील हरिभाऊ सगडे या कडवट शिवसैनिकाची पुनश्च निवड करण्यात आली यामुळे जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर शिवसेनेचे माजी  उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश रेशमे शिरूर आनंतपाळ तालुकाप्रमुख भागवत वंगे निलंगा शहर प्रमुख सुनील नाईकवाडे  जि प माजी सदस्य सुरेंद्र धुमाळ काँग्रेस पक्षाचे निलंगा शहराध्यक्ष अजित नाईकवाडे   शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीचे नगरसेवक सुधीर लखनगावे निलंगा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ काळगे सचिव झटिंग अण्णा म्हेत्रे, माधव पिटले प्रदीप मुरमे अभिमन्यू पाखरसांगवे  मोईज सितारी असलम झारेकर जावेद मुजावर  राजकुमार सोनी मिलिंद कांबळे लक्ष्मण पाटील प्रमोद कदम साजिद पटेल विशाल हलकी कर शेषरावजी मम्माळे सुमित इनानी विजय होगले रिपाई आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष  अंकुश ढेरे अंबादास जाधव शिवसेना माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील विशाल भैया जोळदापके रिपाई नेते विलास सूर्यवंशी देवणी शिवसेना शहर प्रमुख दीपक मळभागे धनराज बिराजदार  सचिन पवार राजकुमार काळे सलीम पठाण अखिल देशमुख संतोष जाधव खरोसेकर यांच्यासह हजारो शिवसेना पदाधिकारी सहज सामाजिक कार्यकर्त्यांनी आज पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *