जीवघेणा हल्ला करणाऱ्या मुजोर वाळूमाफियांवर कडक कारवाई करावी-पत्रकार संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयात दिले निवेदन
निलंगा :-प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील शिरोळ वां.येथे मागील अनेक वर्षापासून अवैध वाळू उपसा होत आहे. यामुळे प्रशासनाच्या वतीने कलम 144 या ठिकाणी अनेक वेळा लावण्यात आले. हीच स्थानिक अवैध वाळू उपसा व गौण खनिज उपसा करत असलेली माहिती स्थानिक पत्रकार सलीम पठाण यांनी प्रशासनासमोर बातमीद्वारे मांडली या बातमीचा राग मनात धरून शिरोळ वा.येथील वाळूमाफिया गणेश जाधव यांनी पत्रकार सलीम पठाण यांना दोन तीन वेळेस दम दिला त्यावेळेस दुर्लक्ष करण्यात आले.व काल रविवारी सायंकाळी ७ वा.यांना शिवीगाळ करत तू गावची बातमी छापायची नाहीस जर छापलास तर फाडुन टाकीन अशी धमकी देऊन अंगावर ट्रॅक्टर घातला मात्र सुदैवाने सलीम पठाण यांनी बाजूला उडी घेतल्याने पुढील अपघाती घटना टळली निलंगा तालुक्यात असे मुजोर वाळू माफिया व गावगुंड नेहमीच पत्रकाराना त्रास देण्याचा प्रयत्न करतात मात्र पोलीस प्रशासन यांना पाठीशी घालत असते या घटनेच्या निषेधार्थ निलंगा पत्रकार संघटनेच्या वतीने आज निलंगा उपविभागीय कार्यालय येथे “पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत” संबंधित वाळू माफयावर कडक कार्यवाही करून अटक करावी व पत्रकाराला संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली तसेच शिरूर पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांना एन सी न घेता गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
यावेळी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ सगरे, अध्यक्ष रामभाऊ काळगे,सचिव झटिंग म्हेत्रे, ज्येष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर, परमेश्वर शिंदे, प्रमोद कदम,मोईज सितारी,माधव पिटले, असलम झारेकर,साजिद पटेल, राजकुमार सोनी,रमेश लांबोटे,जावेद मुजावर,शिवाजी पारेकर,राजकुमार काळे,चंद्रकांत पाटील, विशाल हलकीकर, कुषाबा कांबळे यांनी उपस्थित राहून एस. डी. एम. श्री शरद झाडके यांना घटनेचा क्रम गांभीर्य सांगून प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला तसेच यावेळी छावा संघटनेच्या व संभाजी ब्रिगेडच्या वतीनेही या घटनेला निषेध करून पत्रकार संघटनेला पाठिंबा दिला असून न्यायमिळेपर्यंत छावा संघटना गप्प बसणार नाही असे निलंगा तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंखे व संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष प्रमोद कदम यांनी सांगितले
