सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचा राष्ट्रीय सहकार परिषदेत सहभाग
नवी दिल्ली- देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेनुसार सहकार से समृद्धी या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे देशातील विविध राज्यांचे सहकार मंत्री यांना या राष्ट्रीय परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. या राष्ट्रीय परिषदेस राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी नवी दिल्ली येथे सहभाग नोंदवला. यावेळी विविध राज्याचे सहकार मंत्री,सहकार सचिव या राष्ट्रीय परिषदेत उपस्थित होते.
सहकार क्षेत्रातील नवदृष्टी, नवसिद्धी आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहकाराची भूमिका या विषयावर मोलाचे विचार मंथन झाले असून सहकारात स्वयंपूर्ण भारत घडवण्याच्या दिशेने टाकलेले हे पाउल निश्चित प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी सहकार परिषदेनंतर केले आहे.
