• Wed. Jun 25th, 2025

निलंगा पंचायत समितीच्या संकेतस्थळाचे उदघाटन

Byjantaadmin

Jun 25, 2025

निलंगा पंचायत समितीच्या संकेतस्थळाचे उदघाटन

 निलंगा तालुक्याचे विद्यमान आमदार तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव  पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 20 जून 2025 रोजी पंचायत समिती निलंगा च्या psnilanga.in या संकेतस्थळाचे उद्घाटन आ. संभाजीराव पाटील निलंगेकर,यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच निलंगा तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप . आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी  सोपान अकेले, प्रशांत जाधव, कृषि अधिकारी,  उदय बेलूरकर सहा. प्रशासन अधिकारी,  बालाजी मोहोळकर, क. प्रशासन अधिकारी,  गणेश कुलकर्णी,  संदीपान चव्हाण,  राधा,  बागवान, विस्तार अधिकारी  सुरेश बळवंते, विस्तार अधिकारी  दत्तात्रय जगताप, अनिल सुवर्णकार,  सदाशिव राठोड,  अंकुश शिंदे,  भीमाशंकर रेकळगे तसेच निलंगा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुलकुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  अस्लमजी तडवी, प्रकल्प संचालक श्रीमती कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  श्याम वाखुर्डे,  बाळासाहेब वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली व (ASK) चे जिल्हा व्यवस्थापक  अमित चापले यांच्या तांत्रिक सल्ल्यानुसार संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली.

 संकेतस्थळाच्या निर्मितीमुळे निलंगा डिजिटल युगात-माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर

संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना. आ. निलंगेकर यांनी संकेतस्थळाच्या निर्मितीमुळे निलंगा तालुका डिजिटल युगात वावरत असल्याचा मला मनापासून आनंद होत आहे, असे प्रतिपादन केले. psnilanga.in या संकेतस्थळा मुळे नागरिकांना विविध योजनांची माहिती, विविध स्थळांची माहिती, नागरिकांशी संवाद करणे, इत्यादी गोष्टी सुलभ होतील. सर्व जनतेने संकेतस्थळावर जाऊन पंचायत समितीतील सर्व योजनांची माहिती उपलब्ध करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *