१५ मे पर्यंत तक्रार अर्ज सादर करण्याचे धिरज देशमुख यांचे आवाहन
लातूर: सन २०२४ मधील खरीप पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पूर्वसूचना देऊनही त्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही समिती शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करणार आहे.लातूर, रेणापूर, औसा व इतर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांनी आपले तक्रारी अर्ज आवश्यक माहितीसह दिनांक १५ मे २०२५ पर्यंत संबंधित तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.
