• Thu. May 8th, 2025

12 वी बोर्ड परीक्षेत राजर्षी शाहू (कनिष्ठ विज्ञान) महाविद्यालयाचे उज्वल यश

Byjantaadmin

May 8, 2025

12 वी बोर्ड परीक्षेत राजर्षी शाहू (कनिष्ठ विज्ञान) महाविद्यालयाचे उज्वल यश

लातूर

      इ. 12 वी (एच.एस.सी) बोर्ड परीक्षेचा निकाल आज दि. 05 मे 2025, रोजी जाहीर झाला. राजर्षी शाहू (विज्ञान) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी एकूण 1089 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण 100 टक्के आहे. लातूर विभागाचे विज्ञान शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 89.46 टक्के आहे. या तुलनेत महाविद्यालयाचे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 10.44 टक्के जास्त आहे.

      द्रोणा प्रदीप वीरकपाळे हा विद्यार्थी 94.83 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात सर्वप्रथम आला.  शिवानंद विष्णु तिडके याने 94.50 टक्के गुण मिळवून द्वितीय तर  शिवोहम प्रतापसिंह शिंदे ह्या विद्यार्थ्याने 93.50 टक्के गुण प्राप्त करून सर्वतृतीय आला आहे. महाविद्य़ालयात मुलीत सर्वप्रथम येण्याचा मान स्वानंदी संतोष कुबडे हिने 93.33 टक्के गुण प्राप्त केले आहेत.

जाहीर झालेल्या निकालानुसार एकूण 15 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळाले,         76 विद्यार्थ्यांना 85 टक्क्यापेक्षा जास्त गुण, 250 विद्यार्थी 80 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळाले, तर 431 विद्यार्थी 75 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या महाविद्यालयामधून 100 पैकी 100 गुण मिळवणारे संस्कृत-12, पाली-05, ए.एस.टी. (क्रॉप प्रॉडक्शन)-05 विद्यार्थी आहेत तर मत्स्यशास्त्र विषयात 200 पैकी 200 गुण मिळवणारे 05 विद्यार्थी आहेत.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष  डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरूद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सहसचिव सुनिल सोनवणे व इतर सर्व संचालक, सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. सुहास गोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सीईटी-सेलचे संचालक प्रा. दिलीप देशमुख, उप-प्राचार्य प्रा. एस. एन. शिंदे, पर्यवेक्षक प्रा. जयराज गंगणे, प्रा. डॉ. बी. बी. पाटील, मुख्य-समन्वयक प्रा. स्वप्निल राजेमाने व इतर सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *