नकारात्मकता नाकारुन सकारात्मक धोरण स्विकारल्यास अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने दूर होतील – डॉ. अजीत अभ्यंकर
==============================
निलंगा: आपण आज बेरोजगारीच्या ज्वालामुखीवर उभे आहोत, वाढती लोकसंख्या, शिक्षण, भूकनिर्देशांक, आर्थिक विकास दर, शेती व्यवसायातील असहायता, आर्थिक गुंतवणूक इत्यादी विविध आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करायची असेल तर शासनाने नकारात्मकता सोडून सकारात्मकता स्विकारली पाहीजे ही सकारात्मकताच या आव्हानांवर मात करू शकते असे मत या प्रसंगी आर्थिक व राजकीय विचारांचे अभ्यासक डॉ. अजीत अभ्यंकर यांनी व्यक्त केले. येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय अर्थव्यवस्थेची ७५ वर्षे: संधी आणि आव्हाने या विषयावर एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्या देशात स्वातंत्र्यापूर्वी सायकलसुध्दा बनत नव्हती तिथे आज जवळपास १७५ देशांच्या उपग्रहांचे लॉंचींग होते हे गेल्या ७५ वर्षाच्या अर्थव्यवस्थेचेच श्रेय होय. भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या अर्थव्यवस्थेकडे पाहत असताना स्वतःची स्वतःशी तुलना केली पाहीजे, आपल्या समकक्ष देशांसी आपण तुलना केली पाहीजे शिवाय स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या ध्येय्य आणि उद्देशपूर्तींची आपण तुलना केली पाहीजे तरच आपल्याला या पंचाहत्तर वर्षांतील संधी आणि आव्हाने लक्षात येतील. आपल्यापुढे असलेल्या आव्हानंवर मात करण्यासाठी या देशातील विविध सामाजीक संस्था, स्वायत्त संस्था व शासकांनी एकत्रीतपणे काम करावे लागेल असेही मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभांचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर साहेब हे होते. याप्रसंगी त्यांनी या चर्चासत्रास शुभेच्छा देऊन चर्चासत्र आयोजनामागील भूमिका व्यक्त केली. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक संयोजन सचीव डॉ. शेषेराव देवनाळकर यांनी केले तर महाविद्यालयाचा अशा प्रकारचे चर्चासत्र आयोजनाचा हेतू आपल्या मनोगतातून प्राचार्य डॉ. माधव कोलपूके यांनी व्यक्त केला. याप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव मा. बब्रुवान सरतापे, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, प्राचार्य डॉ. सिध्देश्वर पाटील या उद्घाटन समारंभास उपस्थित होते.
या चर्चासत्राचे बिजभाषक म्हणून मुंबई विद्यापिठातिल प्रोफेसर डॉ. निरज हातेकर हे उपस्थित होते. त्यांनीही याप्रसंगी भारतीय विकासदरावर महत्वपूर्ण अशी मांडणी केली. ते याप्रसंगी म्हणाले की, अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक वाढली तरच देशाचा आर्थिक दर वाढू शकतो. अलीकडे शासन आर्थिक दृष्टिकोणाऐवजी अस्मितेच्या दृष्टीकोणावर अधीक लक्ष देत असल्यामुळे आर्थिक विकासदरावर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत असे विवेचन त्यांनी एनएसएसओच्या आकडे वारीच्या आधारे त्यांनी केले.
या एकदिवसीय चर्चासत्रातिल विविध सत्रांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ७५ वर्षे या विषयावर डॉ. मारूती तेगमपूरे, बिदर येथून उपस्थित असलेले डॉ. देविदास तुमकुंटे, डॉ. अजय मोटे, डॉ. अशोक टिपरसे, डॉ. लक्ष्मण पाटील, डॉ. बालाजी घुटे, डॉ. माधव पलमंटे इत्यादी मान्यवरांनी अभ्यासपूर्ण असी भुमिका मांडली.
या चर्चासत्राच्या समारोप समारंभांचे प्रमूख म्हणून नांदेड येथिल पिपल्स महाविद्यालयाचै डॉ. विकास सुकाळे यांनी याप्रसंगी महाविद्यालयाने एका महत्वाच्या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल आपल्या मनोगतातून अभिनंदन केले. या चर्चासत्राच्या यशस्वितेसाठी संयोजन सचीव डॉ. शेषेराव देवनाळकर, प्रा. पृथ्वी फावडे, डॉ. नरेश पिनमकर, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. हंसराज भौसले, डॉ. अरूण धालगडे, प्रा. मिनाक्षी बोंडगे, ज्ञानेश्वर खांडेकर, सिध्देश्वर कुंभार विद्यार्थी स्वराज देशमुख, आदिनाथ जाधव, परमेश्वर गिरी, कु. सुष्मा बालकुंदे,रूतूजा तांबाळे, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
नकारात्मकता नाकारुन सकारात्मक धोरण स्विकारल्यास अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने दूर होतील – डॉ. अजीत अभ्यंकर
