लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी नरसिंह घोणे
सचिव पदी पंडित हाणमंते तर कोषाध्यक्षपदी मुरली चेंगटे बिनविरोध
लातूर : लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी नरसिंह घोणे यांची तर सचिवपदी पंडित हणमंते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याचवेळी संस्थेच्या कोषाध्यक्षपदी मुरली चेंगटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. 21) रोजी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी लातूरच्या सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी श्रेणी 2 डी.के. वाघमारे हे होते. सहाय्यक म्हणून गोविंद सोलंकर यांनी काम पाहिले. या सभेत संस्था नोंदणीपासूनचे मागील इतिवृत्त वाचून कायम करण्यात आला. त्यानंतर संस्था नोंदणीचे महत्त्व व संस्थेची उपविधी वाचून मान्य करण्यात आली. यावेळी संस्थेचा मुख्य भाग म्हणून संचालक मंडळातून संस्थेच्या अध्यक्षपदी नरसिंह घोणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सचिव पदी पंडित हाणमंते तसेच कोषाध्यक्षपदी मुरली चेंगटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीस संचालक महादेव कुंभार, अभय मिरजकर, सुनील हावा, संगमेश्वर जनगावे, वामन पाठक, संजय स्वामी, संगम पटवारी, रतन कांबळे हे सर्व संचालक उपस्थित होते. निवडीनंतर अध्यक्ष नरसिंग घोणे, सचिव पंडित हाणमंते, कोषाध्यक्ष मुरली चेंगटे यांचा निवडणूक अधिकारी वाघमारे व सहाय्यक सोलंकर यांनी सत्कार केला.
