जम्मू काश्मीर येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व जुलमी वक्फ संशोधन कायदा रद्द करण्यासाठी शहीद टिपू सुलतान संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन
निलंगा : प्रतिनिधी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन स्थळी झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत व तसेच जुलमी वक्फ संशोधन काळा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करत शेर-ए- हिंद शहिद टिपू सुलतान संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करीत मुंडण आंदोलन करण्यात आले.
जम्मू काश्मीर मध्ये पर्यटन स्थळी दहशदवाध्या तर्फे भ्याड हल्ला करण्यात आला होता त्यात देशभरातील 28 निरपराध लोकांचा बळी गेला होता या बळी गेलेल्या नागरिकांच्या परिवारास प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी केंद्र शासनाने द्यावे तसेच वक्फ संशोधन हा काळा जुलमी कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते जिशान मणियार,सद्दाम मणियार यांचे मुंडण करून कालच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.सदरील धरणे व मुंडण आंदोलन केल्यानंतर सदरील मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.सदरील आंदोनास मुस्लिम धर्मगुरु व क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना यांनीही सक्रिय जाहिर पाठिंबा दिला.
सदरील निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर,तालुका अध्यक्ष सब्दर कादरी,शहराध्यक्ष बाबा बिबराळे,मुस्लिम धर्मगुरु मौलाना इलियास,गुलाम रसूल उदगीरकर, अकबर खडके,उमर फारुख औसेकर, अमीन अत्तार,जिशान मणियार,सद्दाम मणियार, माजीद रजा,आफताब बिबराळे, निजाम हाशमी, आवेज शेख, जुबेर शेख,इलियास शेख, शानवाज पटेल, इद्रिस सौदागर, गौस शेख,इलियास शेख, मजहर शेख,सय्यद सत्तार,निजाम शेख,नसीम तांबोली, नाइमोद्दीन खतीब, सोहेल शेख, शाह मोहम्मद कादरी आदीसह मोठ्या संख्येने नागरिक व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
