इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन,निर्मलरत्न चॅरिटेबल ट्रस्ट,दक्ष नागरिक पोलिस मित्र महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित”महाराष्ट्र अभिमान पुरस्कार”वितरण सोहळा उत्साहात संपन्न
ठाणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
समाजाचे आपण काही देण लागतो,त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आपल्या परिने काम करत असते.काही दानशूर व्यक्ती आपले सर्वस्व समाजसेवेसाठी अर्पित करत असतात,पण समाजासाठी गोर गरीब गरजु गरजवंतांना मदतीचा हात देणारी दानशूर व्यक्ती म्हणजे रामजित (जीतु)गुप्ता सर.महाराष्ट्रातील पिडीत, कष्टाळू समाजातील गरजु गरजवंतांना सहकार्य व मदतीचा हात देणारी व्यक्ती रामजित गुप्ता अशी त्यांची ओळख आहे.समाजात अशा अनेक व्यक्ती आपआपल्या परीने समाजकार्य करत असतात त्यांचा योग्य तो सन्मान व्हावा या अनुषंगाने रामजित गुप्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन,निर्मलरत्न चॅरिटेबल ट्रस्ट,दक्ष नागरिक पोलिस मित्र महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ए.सी.क्लब हाऊस,लोढा आमरा,कोलशेत,ठाणे पश्चिम येथे”महाराष्ट्र अभिमान पुरस्कार”सोहळा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी महाराष्ट्रातील शैक्षणिक,वैद्यकीय,उद्योग क्षेत्र, सांस्कृतिक,सामाजिक,कला,क्रीडा,आरोग्य,साहित्य,पत्रकारिता,शासकीय अधिकारी अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या त्या प्रतिभावंत व्यक्तींना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना आकर्षक सन्मानपत्र व सन्माचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करुन त्यांना गौरवांकीत करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर कर्नल रविंद्रजी त्रिपाठी,मिसेस स्टार महाराष्ट्र विजेता प्राची जैन,अभिनेत्री साक्षी नाईक,सिव्हील इंजिनिअर दिगंबर तायडे,माॅटीरेटर ज्योती सनये,वैद्यकीय मदत कक्षाचे न्यायिक सल्लागार धनाजी पवार,सोशल वर्क मध्ये पीएचडी केलेल्या डाॅ.अनिता गुप्ता, मुंबईचे सेवानिवृत्त डीसीपी सीताराम न्यायनिर्गुणे,महिला उद्योजक कामिनी भोसले,बिल्डर-उद्योगपती अशोक जैन,दक्ष नागरिक पोलिस मित्र महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राजेश भोसले,अॅन्टीपायरसी सेल मुंबई चे तपाशी अधिकारी रामजित गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुपाली गायकवाड व रघुसिंग राजपूत यांनी सदाबहार, खेळीमेळीच्या वातावरणात उत्कृष्टरित्या केले. याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रशंसा केली तसेच रामजित गुप्ता यांच्या समाजकार्याचीही मुक्त कंठाने प्रशंसा केली.हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार सोहळा यशस्वी करण्यासाठी सुलक्षणा कांबळे,गायत्री पांडे, राजकुमारी गुप्ता,दीपाली पाटिल, रामजित (जीतु)गुप्ता, सारिका सौदा, स्नेहल ओव्हळ,केतन साळगावकर, मंगेश गुप्ता,महेश गुप्ता,ओम पांडे रहूसिंह राजपूत, रुपाली गायकवाड, केतन म्हात्रे व सहका-यांनी अथक परिश्रम घेतले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
