शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आरी गावातील बौद्ध समाजावर बहिष्कार…
सामाजिक बहिष्कार उठवण्याची विविध पक्ष संघटनेची मागणी…
निलंगा
मौजे आरी तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथील बौद्ध समाजावरील बहिष्कार तात्काळ हटविण्यात यावा अशी मागणी निलंगा येथील विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्याकडे लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे.दिलेल्या निवेदनावर गणराज्य संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे,भीम शक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड,भीम शक्तीचे तालुका अध्यक्ष दिगंबर सूर्यवंशी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अमोल सोनकांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष धम्मानंद काळे,राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष संजय सोनकांबळे,वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप सोनकांबळे,अनुसूचित जाती मोर्चा (भाजपा) निलंगा तालुकाध्यक्ष दयानंद कांबळे इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत..
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मौजे आरी तालुका शि.अनंतपाळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी येथील बौद्ध समाजाच्या रहिवास वस्तीच्या उत्तर बाजुस निळा ध्वज लावण्यात आला होता. व जयंती धूमधडाक्यात साजरी करण्यात आली आहे.
याचाच जातीयवाद्यांच्या पोटशूळ उठल्याने आरी गावच्या ग्रामपंचायतीचे जातीयवादी ग्रामसेवक किशोर व्यंकटराव मुळे यांनी व उपसरपंच पती नारायण मनोहर पवार यांनी संगनमत करून कट रचून सदरील ठिकाणचा निळा ध्वज उखडून फेकून दिला होता. या बाबत तेथील समाज बांधव सचिन ज्ञानोबा गायकवाड यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन संमधिता विरोधात कायदेशिर कारवाई करण्याची मागणी केली होती.मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी कारवाई न करता तक्रारदार सचिन गायकवाड यांच्या विरोधातच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची कारवाई केली आहे.याचाच राग मनात धरून गावातीलच विलास उत्तम पवार, कृष्णा आप्पाराव कदम, संतोष केशव आरिकर,गणेश अनिल पवार, लक्ष्मीबाई सत्यप्रकाश मुळके, कुशाबाई जनार्दन कोलपुके,अनिता अरूण जोगदंड, ग्यानोबा वाघांभर मुळके, सौदागर रंगराव सुर्यवशी (ग्रा.प. सेवक) यांनी व गावातील इतर लोकांनी मिळून कट रचून निळा ध्वज काढून टाकला.
ते लोक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी दिनांक १६ एप्रिल २०२५ पासून त्यात प्रामुख्याने सार्वजनीक पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून पाणी नेण्यास तीव्र विरोध करणे पाण्यासाठी येवू न देणे तेथून हाकलून लावणे, पिठाच्या गिरणीवर दळून न देणे, गावातील दुधाचे वरवे बंद करणे शिवाय किराणा दुकानातून किराना न देता माघारी पाठवत आहेत.शेतीवर कामाला न बोलावणे ,रोजगार उपलब्ध होऊ न देणे. ते जातीयवादी लोक एवढ्यावरच थांबले नाहीत.
तर त्यांनी गावातील काही जातीयवादी गावगुंडाना हाताशी धरून जाणीवपूर्वक बौद्ध समाजाच्या शेजारी असलेल्या उघड्या जागेवर उघड्यावर लघवी करणे, वाईट उद्देशाने महिलांकडे पाहून हातवारे करणे,अश्लील भाषेत चर्चा करणे ऐकू येईल अश्या मोठया भाषेत अश्लील संभाषण करणे त्यामुळे येथील बौद्ध समाजाला जिवन जगणे कठीण झाले आहे.
याबाबत प्रशासनाने समंधीता विरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे…
एकीकडे शासन दरबारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते मात्र लातूर जिल्ह्यात बहिष्काराची घटना घडली आहे. ही अत्यंत निंदनीय घटना आहे.सदरील घटना ही पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे.याबाबत जिल्हा प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन प्रकरणाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल..
रामलिंग पटसाळगे ,लातूर जिल्हा अध्यक्ष गणराज्य संघ…

जिल्हा प्रशासनाने सामाजिक कार्यकर्त्यानी दिलेल्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन शांत आरी गावात जातीयवादाचे तेड निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाज कंटकावर तत्काळ कारवाई करून गावात सामाजिक सलोखा व शांतता निर्माण करण्यात यावा अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी नोंद घेण्यात यावी…
धम्मानंद काळे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष निलंगा…