लातूर विमानतळ विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना
लातूरचे विमानतळ लवकरच सुरू होणार
लातूर; लातर विमानतळ विस्तारीकरण करण्यासाठी जमीन संपादित करून लवकरात लवकर विमानतळ चालू करण्या संदर्भातील मागणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती .त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी हे विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार लातूरचे विमानतळ लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे लातूरच्या रखडलेले विमानतळ विस्तारीकरणासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यासंदर्भाची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी संबंधिताकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून ,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी संचालक मंडळाची एक बैठक नुकतीच मंत्रालयात बोलावली होती .या बैठकीमध्ये त्यांनी लातूर विमानतळ विकास करण्यासंदर्भात संबंधितांना योग्य त्या सूचना केलेल्या आहेत. लातूर विमानतळाचा विकास करावा अशी लातूरातील सामाजिक ,औद्योगिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांची मागणी होती. या मागणीचा धागा पकडून डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पाठपुरावा करत संबंधितांकडे पत्रव्यवहार केलेला होता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या संदर्भात आग्रही मागणी केली होती,आणि लातूर विमानतळ विस्तारीकरणासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत , अशी मागणी केली होती .त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी लातूर विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्न करून विकासासाठी संबंधितांना योग्य त्या सूचना केलेल्या आहेत. लातूर विमानतळाचा विकास झाला तर बीड व धाराशिव सारख्या जिल्ह्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे .त्यामुळे डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश मिळालेले आहे.
लातूर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते तसेच उद्योगाच्या दृष्टीने देखील हे शहर महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते परंतु येथे विमानतळ विमानतळाचे काम रखडले असल्यामुळे या विमानतळाचे विस्तारीकरण करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती त्या मागणीला डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पाठपुराव्यामुळे यश मिळाले असून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेमुळे आता हे विमानतळ लवकरात लवकर सुरू होण्यास मदत होणार आहे.
