महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील प्रा. डॉक्टर गोपाळ मोघे यांच्या पुस्तकाचे विमोचन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते
निलंगा – महाराष्ट्र महाविद्यालय ,निलंगा येथील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. गोपाळ लक्ष्मीकांत मोघे यांच्या ॲनाटोमी फिजिओलॉजी अँड किंसोलॉजी इन फिजिकल एज्युकेशन या पुस्तकाचे विमोचन माननीय केंद्रीय युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्री, भारत सरकार ,श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाला दिल्ली येथील डॉक्टर पियुष जैन यांना नुकताच राष्ट्रपती पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार मिळालेला आहे. तसेच माननीय कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे श्री डॉक्टर मनोहर चासकर व राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक संस्था, ग्वाल्हेर येथील कुलगुरू श्रीमती इंदू बोरा मॅडम ह्याही दुर्दृश्य प्रणाली द्वारे उपस्थित राहणार आहेत .
तर डॉक्टर प्रदीप देशमुख, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड , डॉक्टर बी एन पोळ ,डॉक्टर माधव कोलपुके , उप प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय श्री प्रशांत गायकवाड हे प्रत्यक्ष स्वरूपात उपस्थित राहणार आहेत तसेच डॉक्टर मनोज रेड्डी, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग मुंबई विद्यापीठ ,मुंबई हे सुद्धा या कार्यक्रमाला राहणार आहेत . हा कार्यक्रम महाराष्ट्र वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिनांक एक तारखेला महाराष्ट्र महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये ठीक साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आलेला आहेया कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा चे अध्यक्ष माननीय विजय पाटील निलंगेकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत.हे पुस्तक नवीन शिक्षण धोरण 2020 प्रमाणे बीपीएड , एम पी एड या पदुत्तर व पदवी व पदव्युत्तर या शिक्षणासाठी उपयुक्त आहे
