माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पाठपुरव्यामुळे प्रलंबित
असलेल्या लातूरच्या एक नंबर चौक ते सुभेदार रामजी नगरकडे जाणाऱ्या
रस्त्याच्या कामाला सुरुवात,स्थानिक नागरिकांनी मानले आभार.
लातूर प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री,आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या विशेष
प्रयत्नातून राज्य शासनाच्या
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित
जाती व नव बौद्ध वस्ती सुधार योजने अंतर्गत इंडिया
नगर भागात २०२१-२२ मध्ये नाला मंजूर करण्यात आला होता मात्र स्थानिक
नागरिकांची होणारी गैरसोय व
त्यांच्या मागणीस्तव नाल्याऐवजी शहरातील रस्त्याचे कामे प्रस्तावित
करण्यात आले .या मागणीचा विचार करून दि.२७ मे २०२२ च्या प्रशासकीय
मान्यतेस सुधारित प्रशासकीय मंजुरी दि.१० फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात
आली , त्या मधे एक नंबर चौक ते सुभेदार रामजी नगरकडे जाणाऱ्या
रस्त्याच्या कामालाही मंजुरी घेण्यात आली.मात्र सदरील काम कांही तांत्रिक
अडचणीमुळे मागील कांही दिवस प्रलंबीत राहिले, यावर पुन्हा आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी संबंधित कामाबाबत शासन स्तरावर बैठक घेऊन सदरील
काम तत्काळ चालु करण्याचे आदेश महानगर पालिका प्रशासनास देण्यात आले होते
त्या अनुषंगाने शहरातील एक नंबर चौक ते सुभेदार रामजी नगर
कडे जाणाऱ्या रस्ते कामाची सुरुवात आज दि.२४ एप्रिल गुरुवार रोजी सकाळी
नारळ वाढवून करण्यात आली.या बद्दल स्थानिक नागरिकांनी काम सुरू
झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे आभार
मानले आहेत.
दरम्यान या कामाचा शुभारंभ माजी विरोधी पक्षनेते व
माजी महापौर ऍड.दीपक सूळ,प्रभाग क्रमांक ११ चे निरीक्षक डॉ.बालाजी
सोळुंके, प्रभाग क्र.१० चे निरीक्षक बालाजी मुस्कावाड,प्रभागातील माजी
नगरसेवक आकाश भगत,रत्नदीप अजनीकर,समनव्यक मनोज देशमुख,अनुसूचित जाती
विभाग शहराध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे, आनंदभाई वैरागे,प्रा.शिवशरण
हवाळे,भीमराव मस्के
यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी रफिक करकम,अजय सूर्यवंशी,साजिद शेख,कमलाकर सुरवसे,राजु
ढाले,गोविंद गायकवाड,बाळु गायकवाड, सतीश ढाले,दयानंद कांबळे,सुरेश
बनसोडे,समशेर पठाण,समीर शेख,अभंग कांबळे,आशाताई कांबळे,
यांच्यासह प्रभाग १० व ११ मधील नागरिक उपस्थित
होते.
——————————————
