रीड लातूर” कडून कुटुंब ग्रंथालयाची संकल्पना
खुशीग्राम प्रकल्पातील मुलांना पुस्तके देऊन केला प्रारंभ
धिरज विलासराव देशमुख व सौ.दीपशिखा धिरज देशमुख यांच्या अभिनव संकल्पनेचे कौतुक
“रीड लातूर” उपक्रमात सहभागी होण्याचे केले आवाहन
लातूर :– सध्याच्या काळात अनेकांना मोबाईल, टीव्ही व इतर कारणांमुळे वाचनाकडे लक्ष देणे होत नाही. परिणामी वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे.अशावेळी वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी “रीड लातूर”उपक्रम सुरू करण्यात आला.
सौ.दीपशिखाताई धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून व श्री धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने 6 एप्रिल 2022 रोजी तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिनव गोयल यांच्या हस्ते औसा तालुक्यातील भादा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये रीड लातूर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बहुमोल अशा सहकार्याने लातूर ग्रामीण मधील औसा,लातूर व रेणापूर तालुक्यातील जवळपास १५० जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तके देण्यात आली. या पुस्तकांचे खूप आवडीने तेथील विद्यार्थी नियमीतपणे वाचन करत आहेत.
“रीड लातूर” उपक्रमाचा पुढील दुसरा टप्पा म्हणून “कुटुंब ग्रंथालय” ही संकल्पना सौ.दीप शिखाताई धिरजदेशमुख व श्री धिरज विलासराव देशमुख यांनी पुढे आणली आहे. या उपक्रमांतर्गत कुटुंबांची निवड करून कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनुसार वाचनीय पुस्तके देण्यात येणार आहेत.
सदरील कुटुंब ग्रंथालयाची सुरुवात ६ एप्रिल २०२५ रोजी लातूर मध्ये कार्यरत असलेल्या अनाथ मलांचा सांभाळ करणा-या खुशी ग्राम परिवाराला पुस्तके देऊन करण्यात आली. कुटुंब ग्रंथालयाच्या पहिल्या टप्प्यात ११ कुटुंबांना पुस्तके देण्यात आली आहेत. रीड लातूरने सुरू केलेल्या कुटुंब ग्रंथालय या उपक्रमाचे स्वागत करून सौ.दीपशिखाताई धिरज देशमुख व धिरज विलासराव देशमुख यांच्या अभिनव अशा संकल्पनेचे कौतुक कुटुंबातील सदस्यांनी केले आहे. वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाला चालना मिळते व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होतो.त्यामुळे “रीड लातूर” उपक्रम करत असलेल्या प्रयत्नात सहभागी होण्यासाठी ८३९०३१११११,९०९६०९६०८९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रीड लातूर उपक्रमाचे समन्वयक राजू सी पाटील यांनी केले आहे.
