पानचिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जाहीर
निलंगा/ प्रतिनिधी: निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितिची बैठक आयु त्र्यंबक कांबळे माजी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श भीमनगर येथील बुध्दविहारात घेण्यात आली. त्यामध्ये सन 2025 मध्ये 134 वी जयंती मोठ्या उत्सवात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या करीता खालील कार्यकारणी बिनविरोध जाहीर करण्यात आली.
या बैठकीस दीपक कांबळे, सिध्देश्वर कांबळे, अशोक कांबळे, उत्तम कांबळे, विश्वनाथ कांबळे, कांतराव चिंचोलिकर, प्रसाद कांबळे, सुनिल कांबळे, पेंटर गायकवाड, निखील टोपे, रमाताई टोपे, वसंत कांबळे, दत्ता कांबळे, गोपिनाथ कांबळे व इतर भीम सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिति कार्यकारणी २०२५ खालीलप्रमाणे-
अध्यक्ष- सिद्धांत शरद कांबळे,
उपाध्यक्ष- अमोल ज्ञानोबा कांबळे,
सचिव- सागर बळीराम कांबळे,
कोषाध्यक्ष- मंगेश सिद्धेश्वर कांबळे,
कार्याध्यक्ष- मंगेश धनराज गिरी,
प्रसीध्दी प्रमुख- पिंटु ज्ञानोबा कांबळे,
सहकोषाध्यक्ष- दत्ता मधुकर कांबळे,
मिरवणूक प्रमुख- गोपीनाथ अशोक कांबळे, आत्मदिप कांबळे , संकेत कांबळे, प्रदीप कांबळे,
सजावट प्रमुख- निखिल अरूण टोपे, वसंत लक्ष्मण कांबळे,
महिला अध्यक्ष- रमाताई अरूण टोपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
