मदनसुरी येथील श्री मदनानंद विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा
निलंगा /प्रतिनिधी :-मदनसुरी येथील श्री मदनानंद विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा सन 1992 च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि . ६ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला .अध्यक्षस्थानी शिवाजी गरड गुरुजी होते. पी एम बेळकीरे श्री व्ही के थोरात, एम व्ही मुळे, एम एस जाधव, वाय एल सूर्यवंशी, एस एस लगळी , आर आर गुंड , ए डी कावळे, यु एम सूर्यवंशी, सूर्यवंशी हालसीकर , लक्ष्मण गुरुजी उपस्थित होते. सरस्वती प्रतिमा पूजन व दिवंगत शिक्षकांच्या प्रतिमांचे पूजन करून श्रद्धांजलीने करण्यात आली .पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . मंचावर प्रवेश करताच शिक्षकांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले . त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र , शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . जुन्या आठवणींना माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. व मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर वैभव सबनीस यांनी केले. आभार प्रदर्शन बालाजी माने यांनी केले.लाला शेख ,अशोक देशपांडे, धनाजी सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, गुरुनाथ सूर्यवंशी, बाळू कोरेगावे ,गीता सूर्यवंशी ,कोमल गुंजीटे, शकुंतला चणकापुरे, नीता जाधव ,मुक्ता चाफेकर या माजी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांसाठी भोजन व्यवस्था केली होती . आणि कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीतांनी संपन्न झाला.
