केळगाव येथे ह.बाहांबीर साहेब व ह. बकाशवली ऊर्स उत्साहात
केळगाव:- निलंगा तालुक्यातील केळगाव येथील ग्रामदैवत हजरत बाहांबिर साहेब व हजरत बकाशवली रह. यांची शनिवारी व रविवारी यात्रा उत्साहात संपन्न झाली प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या सातव्या व आठव्या दिवशी भव्य अशी दोन दिवसीय यात्रा भरतेया यात्रेला पंचक्रोशीतील गावकरी नागरिक मोठ्या संख्येने येतात हिंदू-मुस्लिम ऐकता व सर्वधर्मीयांच्या श्रद्धेचे दर्शन घडवणारी यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते.(दिनांक 5 एप्रिल शनिवार रोजी ह.बहांबिर साहेब तर 6 एप्रिल रविवारी ह.बकाशवली* यांची यात्रा संपन्न झाली आहे.केळगावच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर ऐका उंच डोंगरावर ह.बाहाम्बिर साहेब,यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी पार पडतात. घरगुती शुभकार्य असो की लग्नसोहळे हंबीरबाबाला दिपत लावने,मेहंदी- हळद लावने दुभत्या गाईचे, म्हशीचे पहिल तुपाचं दीपत हंबीरबाबलाच अशी धारणा पंचकर्षित ठरलेली आहे !
लग्नानंतर नवीन वधू-वराचं पहिलं दर्शन हे ग्रामदेवतालाच म्हणजे हंबीरबाबा गावाला अनेक पद्धतीने एकत्रित बांधून ठेवणारी यात्रा देवस्थान म्हणजे हे हंबीरबाबायामुळे यात्रेला खूप मोठे महत्त्व प्राप्त आहे. मुंबई-पुणे या ठिकाणी कामासाठी वास्तव्याला असलेले गावकरी सुद्धा या यात्रेला आवर्जून हजेरी लावतात.अगदी साध्या पद्धतीने ही यात्रा असते उदफुल,मलिदा,साखर, गुळ ,बताशे पेढे,भुईमुगाच्या शेंगा व गोड-धोड पदार्थ याशिवाय या देवस्थानाला साधा नारळ सुद्धा चालत नाही.तर हजरत बकाशवली रह. यांना नारळ उदफुल कंदोर्याची परंपरा आहे.यावर्षी गुढीपाडवा,रमजान – ईद , आणि श्रीराम नवमी असल्याने हा दुग्धशर्करेचा योग आहे. यामुळे यावर्षी मोठी गर्दी यात्रेला दिसून येणार आहे. उंच डोंगर, गोडधोड पदार्थ, चिमुकल्याची गर्दी, आईस्क्रीम ची मजा राहतपाळणा, झोके,मोठे बाजार हे विशेष आकर्षण होते. संदल मिरवणूक पासून ते दोन दिवशी यात्रेपर्यंत पोलीस प्रशासनाचे चोख बंदोबस होते यात्रा शांतता व उत्सवामध्ये पार पडली याबद्दल ग्रामस्थ ,मुजावर कमिटी व पत्रकार जावेद मुजावर यांनी सर्वांचे कौतुक व आभार व्यक्त केले आहे.
