• Mon. Apr 28th, 2025

लाडकी बहीण योजनेतून एकाही महीला भगीनीला अपात्र ठरवू नये-आमदार अमित देशमुख यांची मागणी

Byjantaadmin

Mar 7, 2025

लाडकी बहीण योजनेतून एकाही महीला भगीनीला अपात्र ठरवू नये

महीलांसाठी एसटी बस आणि सर्व शहरात सिटीबसमध्ये मोफत प्रवास योजना सुरू करावी

अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्या वरील चर्चेदरम्यान आमदार अमित देशमुख यांची मागणी

लातूरच्या जिल्हा रुग्णालया जागेचा मावेजा निधी मंजूरी बददल मानले शासनाचे आभार

लातूर प्रतिनिधी :
लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या एकाही महीला भगीनीला आता अपात्र
ठरवण्यात येऊ नये, एसटीबसमध्ये महीलांना सरसगट मोफत प्रवास योजना लागू
करावी त्याच बरोबर महानगरपालीकेच्या सिटीबसमध्येही लातूर प्रमाणे
महीलांसाठी मोफत प्रवास योजना सुरू करावी आदी मागण्या माजी मंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी
मागण्यावरील चर्चे दरम्यान बोलतांना केल्या आहेत.
महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर बोलताना
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राज्य शासनाच्या आर्थिक
धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पुरवणी मागण्यांच्या मर्यादा राज्य
शासनाने ओलांडल्या असल्याचे नमूद करुन यावरुन राज्य दिवाळखोरीत जात
असल्याचे स्पष्ट जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले.
लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजनेवर बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, ” निवडणुकीपुर्वी
जेव्हा शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा पात्र अपात्रते बाबतचे
कोणतेही नियम पाहीले नाहीत आता निवणुक संपून सत्ता मिळाल्यानंतर मात्र
सत्ताधारी मंडळी नियम दाखवून पात्र ठरलेल्या महीला भगीनींना अपात्र ठरवत
आहेत. एकवेळा पात्र ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतल्या कोणत्याही महीला
भगीनींना या लाभापासून वगळण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी
केली.

महिलांच्या समस्यांवर प्रकाश
राज्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता शक्ती कायद्याची
अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, महिलांना काही सार्वजनिक कार्यावर अन्य
कामावर चर्चा करायला, एकत्र यायला जागा नाही याचा विचार करता शासनाने
महिलांसाठी गाव, तालुका, जिल्हा पातळीवर महिला भवन उभारावे, अशी मागणीही
त्यांनी यावेळी केली. “महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून
सदया ५० टक्के तिकीट दरात सुट दिली जाते, ही सुट शंभर टक्के करुन
महीलांना मोफत प्रवास योजना लागू करावी असे त्यांनी म्हटले आहे. लातूर
मनपाने महीलासाठी सीटी बसमधून मोफत प्रवास योजना सुरू केली आहे,
राज्यशासनाने राज्यभरातील मनपा क्षेत्रात मोफत सिटी बस योजना सुरू करावी
अशीही मागणी त्यांनी केली.
अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्यात
लातूरच्या जिल्हा रुग्णालयास निधीस मंजूरी
लातूर येथे जिल्हा रुग्णालय बांधकामासाठी निधी उपलब्ध आहे, मात्र जागेचा
मावेजा देण्यासाठी निधी मिळत नसल्याने हे बांधकाम अनेक वर्षापासून
ररखडलेले आहे. सार्वजनीक आरोग्य विभागाकढून कृषी विदयापीठाला जागेचा
मावेजा देण्यासाठी आता तरतूद करण्यात आली असल्याचे आरोग्य मंत्री ना.
प्रकाश आबीटकर यांनी मला सांगीतले आहे त्या बददल मी येथे त्यांचे वशासनाचे आभार मानतो आहे असे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed