एकाच दिवसात पंधरा लाख वीस हजार रुपयाची वसुली ग्रामपंचायतच्या एक दिवसाच्या विशेष वसुली मोहिमेचे यश
………
निलंगा: येथील गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या संकल्पनेतून मार्च एण्ड जवळ येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकाचा वसुलीमध्ये सहभाग असणे गरजेचे आहे म्हणून एकाच दिवशी वसुली मोहीम हा उपक्रम सुरू करण्यात आला होता त्यामुळे गुरुवारी ता. सहा रोजी तालुक्यातील 116 ग्रामपंचायतीने एकाच दिवशी पंधरा लाख वीस हजार रुपये वसूल करून या रकमेचा भरणा शासन दरबारी जमा करण्यात आला आहे.
ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतच्या विविध कर वसुलीसाठी वसुलीसाठी मोठी उदासीनता असते विविध कागदपत्राची आवश्यकता असल्यानंतरच नागरिक कर भरत असतात परंतु वेगवेगळ्या कर स्वरूपातील रक्कम त्यांच्या नावे तशीच वाढत असते याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी एकाच दिवशी तालुक्यातील 116 ग्रामपंचायत मध्ये वसुलीची मोहीम राबवली ग्रामस्थांना घरोघरी जाऊन ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींनी वसुलीसाठी विनंती करीत वसुलीची विशेष मोहीम राषवून या मोहिमेत 116 ग्रामपंचायत मधून एकाच पंधरा लाख वीस हजार 488 रुपयाची वसुली करून ही वसुलीचा भरणा केला आहे त्यामुळे या विशेष मोहिमेचे सर्वत्र कौतुक केले जात असून सध्या मार्च महिना सुरू झाल्यामुळे वेगवेगळ्या विभागाकडून वसुलीसाठी तगादा सुरू असतो त्याचाच एक भाग म्हणून मार्च महिन्यात मार्च अखेरपर्यंत एकाच वेळी अतिरिक्त भार पडू नये म्हणून विशेष वसुली मोहीम राबवत अधिक प्रमाणात असलेल्या घराची वसुली केली आहे त्यामुळे योग्य कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
……
याबाबत येथील गटविकास अधिकारी सोपान अकेले म्हणाले की अशीच मोहीम यापुढेही राबविण्यात येणार असून ग्रामस्थांनी त्यांच्याकडे असलेल्या विविध कराचा भरणा ग्रामपंचायतीकडे जमा करून त्यांच्या पावत्या घ्याव्यात या वसुली मोहिमेला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनीही सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी केले आहे.
……….
