पवित्र रमजान मध्ये शहरातील अतिक्रमणास तात्पुरती स्थगिती देण्यात यावी -संभाजी ब्रिगेड
निलंगा/प्रतिनिधी
मानवतेचा संदेश देणारा पवित्र रमजानच्या महिन्यात फळ,फ्रुट हात गाड्यावर कारवाई अर्थात अतिक्रमण तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रमोद कदम यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की”मुस्लिम धर्मामध्ये रमजान चा महिना पवित्र मानलं जातो. मानवतेचा संदेश देणारा हा पवित्र महिना असल्याने मुस्लिम समाजातील गरीब व छोटे व्यापारी आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह व उपजीविका भावण्यासाठी फळ,फ्रुट व इतर खाण्याचे पदार्थ विक्री करतात.निलंगा शहरांत सर्व समाज एकमेकांच्या सणात गुण्यागोविंदाने हिरीहरीने सहभागी राहत असतो. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन अनेकवेळा निलंगा शहरांतील जनतेने महाराष्ट्राला दिले आहे. आम्ही मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान चा आदर करत आपणांस विनंती करतो की,नगर पालिकेच्या माध्यमातून होणारा अतिक्रमण मोहीम हे पवित्र रमजान चा महिना लक्षात घेता तात्पुरती स्थगिती द्यावी. जेणेकरून खर्चीक असलेला आणि गरीब मुस्लिम समाजातील लोकांना आपला छोटा व्यापार करून या रमजानच्या महिन्यात आपल्या व कुटुंबाची उदरनिर्वाह व उपजीविका भागवता येईल. आम्ही अतिक्रमण मोहीम कायमस्वरूपी स्थगिती द्यावी असे आमचे अजिबात म्हणने नाही,कायद्यानुसार आपण ती कारवाई करावीच. मात्र सदरील पवित्र रमजान चा महिना लोकांची भावना, गरीब मुस्लिम समाजातील छोटे व्यापारी यांच्या व्यथा लक्षात घेऊन किमान मानवतेचा संदेश देणारा पवित्र रमजान महिन्या पर्यंत होणारी नगर पालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण मोहीम तात्पुरती स्थगित करून सहकार्य करावे अशा मागणीचे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.यानिवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, तालुका सहसचिव कुणाल पाटील, शहराध्यक्ष परमेश्वर बोधले,संघटक परमेश्वर जाधव,सिद्धनाथ बळीराम जाधव आदि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
