निटूर च्या सरपंच सौ.प्रतिभा सोमवंशी यांना महिला सरपंच उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार, केंद्रीय मंत्र्याच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण
—————————————————————–
निलंगा /
दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुशंगाने दिनांक 4 व 5 मार्च 2025 रोजी होणाऱ्या 2 दिवसीय कार्यशाळेसाठी लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या सहा गावाच्या महिला सरपंचाचा केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला व उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार देण्यात आला त्यात निलंगा तालुक्यातील निटूर च्या सरपंच प्रतिभा सोमवंशी यांना ही पुरस्कार देवून गौरवण्यात आले त्यामुळे निटूर व पंचक्रोशीमधून त्यांचे अभिनंदन होत आहे .
केंद्रीय पंचायत राज विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील उत्कृष्ट काम करनाऱ्या ग्रामपंचायतीना पुरस्कार देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये निटूर ग्रामपंचायत विकास कामात राज्यात पहिली आली असल्यामुळे सरपंच सोमवंशी यांना पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील इतर ही गावच्या सरपंचांना निमंत्रित करण्यात आले होते
त्यात सौ.सुनीता नारायणपुरे – गणेशवाडी ता.शि. अनंतपाळ, सौ.कोमल गुणाले – नागतिर्थवाडी ता.देवणी, सौ. रंजना म्हेत्रे – बोळेगाव, सौ. प्रिती बुलबुले – सामनगाव ता. लातूर
व रेणापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी सुमित जाधव यांची निवड करण्यात आली होती त्यातुन निटूर गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. प्रतिभा अनिल सोमवंशी यांना महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय महिला सरपंच उकृष्ट कामगिरी हा पुरस्कार दिल्ली विज्ञान भवन येथे केंद्रीय पंचायत राज्य मंत्री भारत सरकार ललन सिंह, पशुपालन व दुग्धविकास केंद्रीय राज्यमंत्री एसपी सिंह बघेल,केंद्रीय महिला व बाल कल्याण विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, केंद्रीय पंचायत राज सचिव विवेक भारतवाज व इतर मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिल्ली येथे महिला दिनाच्या अनुशंगाने गावचे पर्यायाने तालुका, जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही लहान बाब नाही त्यामुळे सरपंच सोमवंशी व
त्यांच्या सोबतच्या सर्व सरपंच महिलांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे.
