• Mon. Apr 28th, 2025

रेणा साखर कारखान्याकडुन चालू गळीत हंगाम गाळपास आलेल्या ऊसाला प्रती मे.टन रु.१००/- प्रमाणे दुसरा हप्ता ऊस पुरवठादाराच्या खात्यावर जमा

Byjantaadmin

Mar 6, 2025

रेणा साखर कारखान्याकडुन चालू गळीत हंगाम गाळपास आलेल्या ऊसाला प्रती मे.टन रु.१००/- प्रमाणे दुसरा हप्ता ऊस पुरवठादाराच्या खात्यावर जमा

दिलीपनगर, निवाडा

राज्यातील साखर उद्योगात सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेला रेणापूर तालुक्यातील निवाडा दिलीपनगर येथील रेणा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ यशस्वीपणे संपन्न झाला असुन कारखान्याने गळीत हंगामामध्ये २,८८,५६२ मे. टन उसाचे गाळप करत २,७१,२०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असुन ज्युस सिरप व बी हेवीसह सरासरी साखर उतारा ११.६१८ टक्के प्राप्त झाला आहे. सद्या डिस्टलरी प्रकल्प सुरु असुन यापासुन इथेनॉलचे उत्पादन सुरु आहे.
चालु गाळप हंगामात सन २०२४-२५ कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख जिल्हा बँकेचे चेअरमन धिरजजी देशमुख यांच्या नियोजनात व मार्गदर्शनामुळे गाळप हंगाम सुरळीत पार पडला आहे

मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख यांनी गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसास रु. ३०००/- प्रति मे.टन याप्रमाणे ऊस दर देणेचे जाहीर केले होते त्यानुसार रेणा सहकारी साखर कारखान्याने यापुर्वी पहीला हप्ता रु. २७००/- प्रति मे.टन याप्रमाणे अदा केलेला आहे. उन्हाळी कामे व ऊस पिक खतासाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी यादृष्टीने गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रति मे.टन रु.१००/- रूपये दि.३ मार्च रोजी ऊस बिलाची रक्कम ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा केली आहे. जाहीर केल्याप्रमाणे लवकरच उर्वरीत उसदर ही अदा केला जाईल. असे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

उसाचा हप्ता बँक खात्यावर जमा

तरी ज्या ऊस पुरवठादारांचा गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये ऊस कारखान्यास गाळपास आला आहे त्यांनी आपल्या संबधीत बँक शाखेशी संपर्क करावा व बिलाची रक्कम घ्यावी असे आवाहन कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाइस चेअरमन आनंतराव देशमुख,सन्माननीय संचालक मंडळ कार्यकारी संचालक बी.व्ही मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed