जनावरांना टॅग तात्काळ मारण्यात यावेत-प्रा. मिरगाळे
निलंगा – शासनाच्या वतीने पशुधन नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शासनाच्या विविध योजनेसाठी ज्यामध्ये जनावराचा गोठा,जनावरांना चारा किंवा कॅल्शियम, मिनिरल मिक्सर इत्यादी संबंधित शासनाकडून मिळणारे लाभ पशुवैद्यकीय कार्यालयाकडून जनावरांची जर नोंद असेल तरच विविध योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळतो. निलंगा तालुक्यातील अनेक गावातील जनावरांची पशुगणना झालेली नाही व त्या जनावरांना अद्याप पर्यंत टॅग मारले गेले नाहीत. जवळपास 50% जनावरे ट्याग मारण्यापासून वंचित आहेत. तरी पशुवैद्यकीय कार्यालयाकडून लवकरात लवकर जनावरांना ट्याग मारून घ्यावे जेणेकरून शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाहीत. जर शासनाने दिलेल्या वेळेच्या आत जनावरांना टॅग नाही मारल्यास शिवसेना व युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे पशुवैद्यकीय अधिकारी यांना दिला आहे. निवेदन देताना सोबत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अमोल ढोरसिंगे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, शहर प्रमुख दैवता सगर,उपशहर प्रमुख रेहाना शेख, युवतीसेना तालुकाप्रमुख मेहराजबी शेख आदींची उपस्थिती होती.
