औसा खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांचे वर्चस्व कायम
औसा : औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक लागली असून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक संचालक पदाच्या जागेसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने व ते उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि.4) वैध ठरल्याने ही निवडणूक झाली आहे. औसा तालुका खरेदी विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांचे या संघावर वर्चस्व कायम राहिले आहे.
औसा तालुका खरेदी विक्री संघाच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी ही निवडणूक जाहीर झाली होती. सोमवारी (दि.3 मार्च) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यामध्ये विद्यमान सभापती तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली 15 उमेदवाराचे उमेदवारी अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.
या निवडणुकीमध्ये संस्था मतदारसंघातून संतोष ज्ञानोबा सोमवंशी, शिवाजी माधवराव हांडे, मारुती गोरखनाथ मगर, नंदकुमार नानासाहेब साळुंके, गणेश प्रल्हाद जाधव तर वैयक्तिक शेतकरी मतदारसंघातून शेखर प्रल्हाद चव्हाण, महादेव शामराव पाटील, केशव तात्याराव डांगे, श्रीधर मनोहर साळुंके, बालाजी सुग्रीव धुमाळ यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून राजीव केशव कसबे, इतर मागासवर्गीय मतदार संघातून सत्यभामा गणपतराव माळी, महिला मतदारसंघातून सविता अरविंद जाधव, मायाबाई राजेंद्र साळुंके, भटक्या जाती जमाती मतदारसंघातून नवनाथ व्यंकट लवटे आदी उमेदवाराचे दाखल झाले होते. हे सर्व उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले. यामुळे या निवडणुकीत सदरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडीचे औसा तालुक्यातील शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.
